Shivaji Maharaj Talwar : आता ‘जगदंबा’ तलवारही भारतात येणार ? शासनाची भूमिका काय…

2024 पर्यंत ही तलवार भारतात आणावी, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. सध्या ही तलवार लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टचा भाग आहे.

236
Shivaji Maharaj Talwar : आता 'जगदंबा' तलवारही भारतात येणार ? शासनाची भूमिका काय...
Shivaji Maharaj Talwar : आता 'जगदंबा' तलवारही भारतात येणार ? शासनाची भूमिका काय...

महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. (Shivaji Maharaj Talwar) सध्या अफझलखानाचा कोथळा काढलेली वाघनखे भारतात येणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. त्यात अजून एका आनंदाच्या बातमीची भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः भवानीदेवीने दिलेली आणि स्वराज्याच्या अनेक शत्रूंचा नायनाट करणारी ऐतिहासिक जगदंबा तलवारही लवकरच भारतात येणार आहे.

जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याच्या मोहिमेला मागील काही दिवसांपासून वेग आला आहे. भास्कर घोरपडे यांनी सुरु केलेल्या या प्रयत्नांमध्ये आता महाराष्ट्र सरकारही सहभाग देत असून ही तलवार भारतात पाठवण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान  ऋषी सुनक यांच्याकडे सातत्याने मागणी होत आहे. 2024 पर्यंत ही तलवार भारतात आणावी, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. सध्याच्या घडीला ही तलवार लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमधील रॉयल कलेक्शन ट्रस्टचा भाग आहे. (Shivaji Maharaj Talwar)

(हेही वाचा – Ind vs Pak World Cup 2023 : ‘भारताविरोधात 5 विकेट घेणार’; सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीची हुंकार)

तलवार परत आणण्यासाठी यापूर्वीही झाले होते प्रयत्न

1857 मध्ये कोल्हापूरच्या तत्कालीन महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवे यांना ही तलवार त्यांच्या भारत दौऱ्यात भेट दिली होती.  तलवारीची मूठ लोखंडी असून, त्यावर गोलाकार परज आहे. तलवारीच्या मुठीपाशी सोन्याच्या फुलांचे नक्षीकाम, मोठे ठसठशीत हिरे आणि माणिक जडवण्यात आले आहेत, असे वर्णनांमध्ये आढळते. यापूर्वीही जगदंबा तलवार भारतात येण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे तलवार परत मिळावी, यासाठीची याचिका पाठवण्यात आली होती. भारतातून करण्यात आलेल्या या याचिकेवर उत्तर म्हणून ही तलवार अतिशय सुरक्षितपणे जतन करण्यात आली असून ब्रिटनमध्ये येणाऱ्या भारतीयांना ती पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे ब्रिटनने सांगितले होते. (Shivaji Maharaj Talwar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.