S Jaishankar : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर सुरक्षेत केली वाढ

161
S Jaishankar : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर (S Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. एस जयशंकर यांची सुरक्षा वाय वरून झेड कॅटगरीची करण्यात आली आहे. याचबरोबर, छत्तीसगडचे अमित जोगी यांना देखील झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, आयबीने जारी केलेल्या धमकीच्या रिपोर्टनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांची सुरक्षा वाय वरून झेड करण्यात आली आहे. आयबीच्या रिपोर्टनंतर गृह मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता एस जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी पूर्वीपेक्षा जास्त जवान तैनात केले जाणार आहेत. एस जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी आता ३६ सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Ind vs Pak World Cup 2023 : ‘भारताविरोधात 5 विकेट घेणार’; सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदीची हुंकार)

केंद्र सरकारने (S Jaishankar) सुरक्षेसाठी एकूण ५ कॅटगरी तयार केल्या आहेत. यामध्ये एक्स, वाय, वाय प्लस, झेड आणि झेड प्लस कॅटगरी आहेत. व्यक्तीचे महत्त्व आणि धोका लक्षात घेऊन ही सुरक्षा दिली जाते. याशिवाय, पंतप्रधानांसाठी एसपीजी सुरक्षेचीही तरतूद आहे. झेड कॅटगरीमध्ये ४ ते ६ एनसीजी कमांडो, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा समावेश असतो.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.