ऋजुता लुकतुके
डेंग्यूच्या तापातून सावरणारा शुभमन गिल (Ind vs Pak Shubman Gill) गुरुवारी (१२ ऑक्टोबर) संध्याकाळी पॅड्स बांधून सरावासाठी उतरला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुढे त्याने एक तास फलंदाजीचा सरावही केला. अर्थात, अजून अशक्तपणा जाणवत असलेल्या गिलला भारतीय संघ पाक विरुद्धच्या मोठ्या लढतीसाठी खेळवेलच असं सांगता येत नाही.
या आजारपणानंतर पहिला सराव करताना मात्र शुभमन (Ind vs Pak Shubman Gill) चांगलाच सकारात्मक होता. सकाळी अकरा वाजताच तो नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये आला. तिथे त्याने वैद्यकीय तज्ज रिझवान यांच्या मार्गदर्शनाखाली धावणे आणि हलका व्यायाम केला. त्यानंतर तो फलंदाजीच्या नेट्समध्ये गेला.
हे खास सराव सत्र भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून आयोजित करण्यात आलं होतं. आणि भारतीय संघाने (Ind vs Pak Shubman Gill) शुभमनसाठी डावखुरा फिरकी गोलंदाज नुवान सेनेविरत्नेलाही लवकर बोलावलं होतं. शुभमन नेमका किती तंदुरुस्त आहे आणि तो सामना खेळू शकेल का हे जोखण्याचा भारतीय संघाचा हा प्रयत्न असावा. भारतीय संघ अहमदाबादला पोहोचण्यापूर्वीच एकटा गिल मैदानावर हा सराव करत होता.
(हेही वाचा – Virat Kohli : कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम)
त्यावरून भारतीय संघ गिलला लवकरात लवकर पुनरागमनासाठी तयार करत आहे एवढं नक्की.
Shubman Gill has started the batting practice.
– Great news for Team India. pic.twitter.com/lkfcNgEi1F
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2023
पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीची गोलंदाजी शुभमन खेळू शकेल का यासाठी हे विशेष सराव सत्र होतं. आणि श्रीलंकन सेनेविरत्ने बरोबरच काही नेट्स गोलंदाजांनीही शुभमनला तेज गोलंदाजी टाकली. दोघांविरुद्ध शुभमन (Ind vs Pak Shubman Gill) आरामात खेळत होता.
भारतीय संघातील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिल (Ind vs Pak Shubman Gill) दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी तयार आहे का हे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना तपासायचं होतं. शिवाय प्रचंड गरमीत १०० षटकांचा सामना तो खेळू शकेल का याची चाचपणी करण्यासाठी हे सत्र आयोजित केलं होतं.
आता शुक्रवारी शुभमनची (Ind vs Pak Shubman Gill) तंदुरुस्ती पाहून संघ प्रशासन त्याला खेळवण्यावर अंतिम निर्णय घेतील. शुभमनपुरतं बोलायचं झालं तर रविवारपर्यंत तो रुग्णालयातच होता. आणि त्याचा ब्लड प्लेटेलेट काऊंट ७०,००० वर आला होता. असं असताना गुरुवारी त्याने चक्क फलंदाजीचा सराव करणं हे खूपच सकारात्मक चित्र आहे.
२४ वर्षीय सलामीवीर शुभमन गिलला (Ind vs Pak Shubman Gill) विश्वचषक सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी ताप आला. आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धचे दोन्ही सामने तो खेळू शकला नव्हता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community