Mahadev Book Application : महादेव बुक अ‍ॅपच्या प्रवर्तकांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत हातमिळवणी

पाकिस्तान मध्ये दाऊदचा भाऊ चालवतो बेटिंग अ‍ॅप

174
Mahadev Book Application : महादेव बुक अ‍ॅपच्या प्रवर्तकांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत हातमिळवणी
Mahadev Book Application : महादेव बुक अ‍ॅपच्या प्रवर्तकांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत हातमिळवणी

महादेव बेटिंग अ‍ॅपचे (Mahadev Book Application) मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी सट्टेबाजीच्या व्यवसायात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim) सोबत हातमिळवणी केली आहे. चंद्राकर आणि उप्पल यांनी पाकिस्तानमध्ये ‘खेलोयार’ (kheloyaar) नावाने नवीन बेटिंग अ‍ॅप सुरू केले असून, हा बेटिंग अ‍ॅपचे ऑपरेटिंग दाऊदचा भाऊ मुश्ताकीम इब्राहिम कासकर (Mustakim Ibrahim Kaskar) हा करीत असल्याचे ईडीच्या (ED) तपासात समोर आले आहे. दाऊद याने अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवसायासोबत बेकायदेशीर सट्टेबाजीत प्रवेश केला असून भारतात सुरू असणाऱ्या बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅपवर भारतीय तपास यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. (Mahadev Book Application)

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या क्रिकेटचा ज्वर चढला आहे. भारत देशासह पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात या क्रिकेट सामन्यावर बेटिंग (सट्टेबाजी) सुरू आहे. बेटिंगसाठी भारतात मोठ्या ‘ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्लिकेशन’ (Online Beating Application) बेकायदेशीरपणे सुरू आहे. भारतात सध्या महादेव बुक अ‍ॅपचा बोलबाला असून महादेव बुक अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि उप्पल यांनी या अँपच्या माध्यमातून शेकडो ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप सुरू केले आहे. हे बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅपसाठी भारतातील अनेक राज्यात ऑपरेटर नेमण्यात आलेले आहे. (Mahadev Book Application)

हे ऑपरेटर बेटिंगच्या बेकायदेशीर व्यवसायातुन होणाऱ्या कमाईतून ७० टक्के कमाई ही चंद्राकर आणि उप्पल यांना हवाला मार्फत पाठवले जाते तर ३० टक्के कमाईत हे ऑपरेटर बेकायदेशीर अ‍ॅप भारतातून चालवतात. ईडीच्या रडारवर असलेल्या महादेव बुक अ‍ॅप प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दुबईत (UAE) बसून महादेव बुक अ‍ॅप चालवणारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी या बेकायदेशीर व्यवसायातुन हजारो कोटींची उलाढाल सुरू आहे. चंद्राकर आणि उप्पल यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत हातमिळवणी केली आहे, दाऊदच्या संरक्षणात चंद्रकार आणि उप्पल पाकिस्तानमध्ये नवीन बेटिंग अ‍ॅपची निर्मिती केली आहे. (Mahadev Book Application)

पाकिस्तान (Pakistan) मध्ये जुगार आणि सट्टेबाजीवर संपूर्णपणे बंदी असून या देशात जुगारावर कडक कायदे असताना केवळ दाऊदच्या संरक्षणात पाकिस्तानमध्ये खेलोयार या बेटिंग अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या बेटिंग अ‍ॅपच्या ऑपरेटिंग दाऊदचा भाऊ मुश्ताकीम इब्राहिम कासकर हा करीत असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने चंद्राकरच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या खाजगी संरक्षणातील सुरक्षा रक्षकांपैकी २५ ते ३० बाऊन्सर प्रदान केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mahadev Book Application)

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : २४ तासांत उत्तर गाझा रिकामा करा; इस्रायलचा पॅलेस्टिनींना आक्रमक इशारा)

सूत्रांनी सांगितले की चंद्राकरकडे चार ते पाच आलिशान कार आणि एसयूव्ही आहेत आणि तो दुबई आणि इतर ठिकाणी कडक सुरक्षेत फिरत आहे. चंद्राकर याला स्वतः बुलेटप्रूफ रोल्स रॉयस कार देण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणेच्या भीतीने चंद्राकार हा ज्या पार्टीत सभारंभात जातात त्या ठिकाणी त्याच्या आगमनापूर्वी सर्व तपासणी केली जाते. महादेव सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणात चंद्राकर ईडीच्या रडारवर असल्याने, तो सार्वजनिक ठिकाणी कमी प्रमाणात हजेरी लावत आहे आणि बहुतेक बैठका निवडक खाजगी निवासस्थान किंवा रिसॉर्ट्समध्ये खाजगीत होतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Mahadev Book Application)

‘खेलोयार’ अ‍ॅप काय आहे?

‘खेलोयार’ हे महादेव बुक अ‍ॅपसारखेच एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी रुपयांमध्ये सट्टेबाजी करून अनेक पैसे जिंकता येतात. खेलोयार अ‍ॅप हे कासकरच्या सहाय्यकाद्वारे चालवले जाते जो पाकिस्तानातील सिंध प्रांताचा आहे, चंद्रकर आणि उप्पल यांच्या नेतृत्वाखाली. महादेव बेटिंग अ‍ॅप बेकायदेशीरपणे ६० विषम बेटिंग गेमिंग अँप्स आणि साइट्स चालवत असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासकरकडे दुबईचा रहिवासी व्हिसा आहे जो त्याने १९९७ मध्ये पाकिस्तानने जारी केलेला पासपोर्ट वापरून मिळवला होता. कासकर १९८६ मध्ये त्याचा भाऊ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह भारतातून पळून गेल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून, तो दुबई, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये जागा बदलत आहे. (Mahadev Book Application)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.