-
ऋजुता लुकतुके
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष उलटून गेल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं रशियन ऑलिम्पिक समितीवर निलंबनाची कारवाई केली आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला एक वर्ष होऊन गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं रशियन ऑलिम्पिक समितीचं तातडीने निलंबन केलं आहे. ऑलिम्पिक परिषदेच्या मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. (Russian Olympic Committee Suspended)
रशियाने या हल्ल्यात युक्रेनचे चार प्रांत आपल्या ताब्यात घेतले आहेत आणि यातील ऑलिम्पिक संघटनावरही वर्चस्व स्थापन केलं आहे. रशियाच्या या कृतीमुळे अखेर ऑलिम्पिक परिषदेनं हा निर्णय जाहीर केला. युक्रेनमधील लुहान्स्क, खेरसन, डोनबास्क आणि झेपोरिशिया या चार प्रांतांमधील ऑलिम्पिक समित्या रशियाने गेल्याच महिन्यात रशियातील ऑलिम्पिक समितीमध्ये विलीन केल्या. या कृतीनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेसमोर रशियन समितीच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तो सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. (Russian Olympic Committee Suspended)
(हेही वाचा – Mahadev Book Application : महादेव बुक अँपच्या प्रवर्तकांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत हातमिळवणी)
IOC Executive Board suspends Russian Olympic Committee with immediate effect.
IOC statement: pic.twitter.com/vS7YoT1MLx
— IOC MEDIA (@iocmedia) October 12, 2023
मुंबईतील बैठकीनंतर ऑलिम्पिक परिषदेनं पत्रक काढून हा निर्णय जाहीरही केला. अर्थात, रशियन ॲथलीट देशाच्या झेंड्याशिवाय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. पण, त्यांची कामगिरी रशियाच्या नावावर मोजली जाणार नाही. किंवा हे ॲथलीट रशियाचं प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. युक्रेननं आंतरराष्ट्रीय परिषदेच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर रशियाने ही पाश्चात्य जगाची राजकीय खेळी असल्याचं म्हटलंय. (Russian Olympic Committee Suspended)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community