मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) ५.६८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या हे कोकेन एकूण ५६८ ग्रॅमचे आहे,. यामध्ये ३ विदेशी महिलांना अटक करण्यात आली असून त्यापैकी दोन युगांडा आणि एक टांझानियाच्या महिलेचा समावेश आहे.
सॅनिटरी पॅडमधून या अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत होती. पहिल्यांदाच अशा प्रकारची तस्करी केली जात आहे. या तिनही महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईत सध्या विविध ठिकाणांहून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. डिआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठे आव्हान)
Join Our WhatsApp Community