World Cup 2023 : भारत – पाक सामना पाहण्यासाठी अमिताभ, रजनीकांत सचिन आणि बरेचजण……..

भारत-पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी बॉलीवूडच्या कलाकारांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

123
World Cup 2023 : भारत - पाक सामना पाहण्यासाठी अमिताभ, रजनीकांत सचिन आणि बरेचजण........
World Cup 2023 : भारत - पाक सामना पाहण्यासाठी अमिताभ, रजनीकांत सचिन आणि बरेचजण........

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी बॉलीवूडचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दुपारी होणार आहे. पण या कार्यक्रमामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामान उशिरा सुरु होणार आहे का, याची माहिती आता समोर आली आहे. या सर्व गोष्टी सामन्यापूर्वी होणार आहेत. नक्की या सामन्याला कशामुळे वेळ लागणार आहे हे जाणुन घेऊया. (World Cup 2023)
भारत-पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी बॉलीवूडच्या कलाकारांचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन, अरजित सिंग आणि सुखविंदर सिंग हे आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर यावेळी बॉलीवूडमधील काही स्टार अभिनेते व अभिनेत्रीही यावेळी आपली कला सादर करणार आहेत.

(हेही वाचा : Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ विदेशी महिलांना अटक)

या सामन्यासाठी काही खास व्यक्तींनी आमंत्रित करण्यात आले आहे. वर्ल्ड कपपूर्वी काही खास व्यक्तींना वर्ल्ड कपचे गोल्डन तिकीट दिले होते, त्या व्यक्ती या सामन्याला उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत या महान व्यक्तींचा समावेश असणार आहे. बॉलीवूड स्टार्सचा कार्यक्रम शनिवारी दुपारी १२.४० वाजता सुरू होईल आणि दुपारी १.१० वाजता संपेल. यावेळी लहान मुले खेळाचे शुभंकर म्हणून काम करतील आणि संघांना मैदानावर घेऊन जातील. यावेळी पीसीबीचे काही अधिकारीही येणे अपेक्षित आहेत. हा सर्व कार्यक्रम दुपारी १.१० वाजता संपणार आहे आणि या सामन्याचा टॉस दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमामुळे तरी सामन्यावर कोणता परीणाम होणार असल्याचे दिसत नाही. कारण या सामन्याचा टॉस हा दुपारी १.३० वाजता केला जाईल. त्यानंतर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील. त्यानंतर काही काळ दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात सराव करतील. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे राष्ट्रगीत होणार आहे. यानंतर काही वेळात सामना सुरु केला जाईल. त्यामुळे टॉस झाल्यावर अर्ध्या तासात हा खेळ सुरु होईल, याचाच अर्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुपारी २.०० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणार असला तरी त्याचा सामन्यावर मात्र कोणताही परीणान होणार नाही. (World Cup 2023 )

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.