Israel -Palestine Conflict : इस्रायलने पुढील २४ तासात गाझा पट्टी सोडण्याचे दिले आदेश

त्तर गाझा पट्टीतून ११ लाख पॅलेस्टिनी नागरिकांना शहर सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

241
Israel -Palestine Conflict : इस्रायलने पुढील २४ तासात गाझा पट्टी सोडण्याचे दिले आदेश
Israel -Palestine Conflict : इस्रायलने पुढील २४ तासात गाझा पट्टी सोडण्याचे दिले आदेश

इस्रायल आणि हमास, यांच्यात सुरू झालेल्या युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. पुढील २४ तासात इस्रायली सैन्य गाझावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ओलिस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सर्वात मोठा हल्ला करणार आहे. यासाठी इस्रायलने पुढील २४ तासांत उत्तर गाझा पट्टीतून ११ लाख पॅलेस्टिनी नागरिकांना शहर सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. (Israel -Palestine Conflict)
निम्म्या लोकांना बाहेर काढावे लागणार संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी सूमारे अकरा लाख नागरिक  बाहेर काढावे लागतील.इस्रायली सैन्याने शहरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना दक्षिणेकडे गाझा पट्टीकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इस्रायलने यापूर्वीच गाझाच्या २.३ मिलियन लोकांचे अन्न-पाणी, इंधन आणि वीज पुरवठा बंद केला आहे. इस्रायली लष्कराच्या १ लाख सैनिकांनी गाझाला वेढा घातला असून इस्रायली रणगाडे गाझाकडे वेगाने सरकू लागले आहेत. इस्रायली सैनिक सरकारच्या आदेशाची वाट बघत असल्याची माहिती मिळत आहे. ग्राऊंड ऑपरेशनसाठी सैन्य गाझामध्ये उतरू शकतं. इस्रायलने हमासला २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून २४ तासांत गाझा सोडण्यास सांगितले आहे. (Israel -Palestine Conflict)

(हेही वाचा : Maharashtra Police ACP Promotion : मुंबईसह राज्यातील १०४ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती)

इस्रायलने सीमेवर सैन्य पाठवले इस्रायलने आपले उत्तर क्षेत्र मजबूत करण्यासाठी सीमेजवळील शहरांमध्ये सुरक्षा दल तैनात केले आहेत. सीमेवर पाच किलोमीटरच्या परिसरात विरळ लोकवस्ती आहे आणि बहुतांश व्यावसायिक सुविधा बंद आहेत. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीकडे ३ लाख सैनिकांची तैनाती केली आहे. आता हळुहळू टँकदेखील पाठवले जात आहेत. यावरुन युद्ध अटळ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजवले जात आहेत. ही हल्ल्याची सूचना असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही तासात भीषण परिस्थिती पाहयला मिळू शकते.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.