उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे. ( Megablock)
हार्बर मार्गावरील सीएसएमटी -चुनाभट्टी/वांद्रे अप – डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे –
कुठे- ठाणे- कल्याण पाचवी सहावी मार्गिकेवर
कधी- मध्य रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत
या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईतून जाणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या दोन्ही दिशेच्या मेल- एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्गावर
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर
सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. तर पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
(हेही वाचा : Israel -Palestine Conflict : इस्रायलने पुढील २४ तासात गाझा पट्टी सोडण्याचे दिले आदेश)
पश्चिम रेल्वे –
सांताक्रुज ते गोरेगांव अप- डाऊन जलद मार्गावर
सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत
या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुज ते गोरेगांव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे.
Join Our WhatsApp Community