आमदार अपात्रतेच्या सुनावणीसंदर्भात होत असलेल्या दिरंगाईबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी घेण्यात आली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी तीव्र शब्दांत ताशेरे ओढत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभा अध्यक्षांकडून सादर करण्यात आलेले वेळापत्रक फेटाळून लावत मंगळवारी नवे वेळापत्रक सादर करावे अन्यथा आदेश पारित करू, या शब्दांत न्यायालयाने खडसावले. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले की, कोणतीही तडजोड न करता मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय मी घेईनच. सर्वोच्च न्यायालायाच्या (Supreme Court) आदेशांचा अनादर कुठेही केला जाणार नाही. पण विधिमंडळाची आणि विधानभवनाचे सार्वभौमत्व राखणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून मला निर्णय घ्यायचा आहे. विधिमंडळाचे नियम आणि संविधानाच्या तरतुदी यांच्याशी कुठेही तडजोड न करता मला निर्णय घ्यावा लागेल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. निवडणुकींना समोर ठेवून निर्णय देणार नाहीनिवडणुकींना समोर ठेवून निर्णय देणार नाही. लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करणार आहे. संविधानिक तरतुदींचे पालन न करता निर्णय घेतला, तर ते चुकीचे ठरेल. नैसर्गिक न्याय, तत्व, विधिमंडळातील नियम आणि तरतुदींबरोबर कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही. याचे भान राखत निर्णय घ्यावा लागेल. मी हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवेन, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा Ind vs Pak Review : भारत-पाक सामन्याचं दडपण पेलेल, तोच संघ जिंकेल)
Join Our WhatsApp Community