Ind vs Pak : भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर का होतोय #BoycottIndoPak हा ट्रेंड?

143
Ind vs Pak : भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर का होतोय #BoycottIndoPak हा ट्रेंड?

विश्वचषकातील सगळ्यात हाय-प्रोफाईल सामना (Ind vs Pak) म्हणून १४ ऑक्टोबरच्या भारत – पाक लढतीकडे पाहिलं जात आहे. नवरात्री सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी होणारा हा सामना षटकार, चौकारांची उधळण करणारा होवो अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. पण, दुसरीकडे मात्र एक्स म्हणजेच ट्विटरवरून भारत पाकिस्तान या सामन्याचा निषेध करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी ट्विटरवर #BoycottIndoPak हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.

एकीकडे १३ सप्टेंबर रोजी, काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स युनिटचे एक कर्नल आणि एक मेजर आणि पोलीस उप अधीक्षक हुतात्मा झाले. तर दुसरीकडे भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी आलेल्या पाकिस्तानी खेळाडूंची (Ind vs Pak) अतिशय आनंदात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. पाकिस्तानकडून दहशतवादाच्या घटना सुरू असताना पाकिस्तानी खेळाडूंना अशी वागणूक का दिली जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडला तर काही जणांनी यावर संताप व्यक्त केला. यामुळेच ट्विटरवर #BoycottIndoPak हा हॅशटॅग (Ind vs Pak) ट्रेंड झाला.

(हेही वाचा – Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल, २३२ जणांचा समावेश)

असं असाल तरीही क्रिकेटप्रेमींच्या (Ind vs Pak) उत्साहावर काही फरक पडलेला नाही. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान या सामन्याची जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त तिकिटं विकल्या गेली आहेत. या निषेधाच्या हॅशटॅगचा बीसीसीआय किंवा आयसीसीवरही परिणाम होणार नाही.

भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये (Ind vs Pak) तब्बल ७ वेळा भिडले, आणि या प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानी संघाला धूळ चारली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.