श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास?

श्री मलंग गडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे, तशी पेशवेकालीन इतिहासात नोंद आहे. या मुख्य स्थानापासून अलीकडे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या समाधी आहेत. याच गडावर नाथपंथीयांचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे. तसेच अन्य ५ नाथांच्याही समाधी आहेत. याच गडावर श्री गणेश, श्री हनुमान आणि देवीचेही मंदिर आहे.   

2975

ठाणे जिल्ह्यातील श्री मलंग गडावर यंदाच्या होळी पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार हिंदू धर्मीय हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संख्येने गडावर आले. तेथील दीक्षा गादीची आरती करू लागले,  त्याच वेळी तिथे धर्मांध मुसलमान ५०-६० संख्येने घुसखोरी करून आले आणि ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत आरतीमध्ये अडथळा आणू लागले. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. मुसलमानांनी हिंदूंना धक्काबुकी केली. विशेष म्हणजे पोलिसांनी कोरोनाचे कारण दिल्याने यंदाच्या वर्षी आरतीसाठी केवळ ५ हिंदूंना आरतीसाठी आतमध्ये प्रवेश दिला होता, मात्र धुडगूस घालण्यासाठी ५०-६० मुसलमान आले होते, या प्रकरणाचा व्हिडिओ ‘हिंदुस्थान पोस्ट’मधून सर्वत्र व्हायरल झाला आणि तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांमध्ये श्री मलंग गडाचा इतिहास काय आहे, हे श्रद्धास्थान नक्की हिंदूंचे कि मुसलमानांचे? अशी जिज्ञासा निर्माण झाली. शेकडो जणांनी सोशल मीडियाद्वारे आमच्याकडे याचा नक्की इतिहास काय, अशी विचारणा केली. त्यामुळे आम्ही खास वाचकांसाठी श्री मलंग गडाचा नक्की इतिहास काय, त्याविषयीचा वाद काय हे जाणून घेतले.

श्री मलंग गडाचा काय आहे इतिहास?

  • श्री मलंग गडावर नाथपंथाची दीक्षा गादी आहे. तेथे हिंदू धर्मीय दर्शनासाठी जातात, होळी पौर्णिमेला आरती करतात
  • या मुख्य स्थानापासून अलीकडे दोन समाधी आहेत. त्या जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या आहेत.
  • तर याच गडावर नाथपंथाचे श्री मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे, तसेच अन्य ५ नाथांची समाधीही आहे.
  • याच गडावर श्री गणेश, श्री हनुमान आणि देवीचे मंदिरही आहे.
  • सध्या ही दीक्षा गादी आणि दोन समाधी स्थळे यांवर मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे.
  • पेशव्यांनी या ठिकणी पूजापाठ करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण केतकर घराण्याकडे दिला.
  • पूर्वापार पिढ्यानपिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्या पुढच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे.
  • आजही या ठिकाणी सर्व धार्मिक विधी हिंदू धर्माप्रमाणे होतात.
  • धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनाही याच दीक्षा गादी येथे नाथपंथाची दीक्षा देण्यात आली.
  • तेव्हापासून धर्मवीर स्व. आनंद दिघे हेही होळी पौर्णिमेला श्री मलंग गडावर आरतीसाठी येत असत.

ठाणे जिल्ह्यात नवनाथ पंथाचा प्रभाव जास्त होता. नाथपंथाच्या हिंदू संन्याशाला मलंग म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून त्याला श्री मलंग गड म्हटले आहे. मुसलमानांनी त्याला हाजी मलंग म्हणायला सुरुवात केली. ‘हाजी’ हा शब्द या देवस्थानाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये कुठेही आढळून येत नाही. ‘मलंग’ या शब्दाचा उल्लेख सापडतो. मधल्या काळात मुसलमानांनी या देवस्थानावर वर्चस्व गाजवण्यासाठी धाकदपटशहा सुरु केला आणि त्या देवस्थानाचे दर्ग्यात रूपांतर केले. तेव्हापासून मुसलमानही त्यावर दावा करतात. परंतु तेथील सर्व धार्मिक विधी ह्या हिंदू पद्धतीने होत असतात, त्यासाठी तेथे पूजा करण्याचा मान कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण केतकर घराण्याकडे आहे, पूर्वापार पिढ्यान पिढ्या हा वारसा केतकर घराण्याच्या पुढच्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे. ते जर मुसलमानांचे स्थान असते, तर तिथे हिंदू पुजारी कसे? धार्मिक विधी हिंदू धर्माप्रमाणे कसे होतात?
पांडुरंग बेलकवडे, इतिहास संशोधक

काय आहे वाद?

  • या देवस्थानावर मागील शतकापासून मुसलमानानी अतिक्रमण केले आहे.
  • त्यामुळे सध्या यावर ठाणे स्थानिक न्यायालय, उच्च न्यायालयात आणि ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दावे प्रलंबित आहेत.
  • त्यामध्ये नासिर खान फाजल खान प्रतिवादी म्हणून दाखल आहेत.

(हेही वाचा : श्री मलंग गडावर महाआरतीत मुसलमानांचा हैदोस!)

काय आहे न्यायालयीन वाद? 

  • या प्रकरणात दाखल दावे ही नाथपंथाचे मदन बलकवडे हे पाहत आहेत. मदन बलकवडे यांच्या म्हणण्यानुसार श्री मलंग गडावरील देवस्थान हे नाथपंथियांची दीक्षा गादी आहे. या ठिकाणी हिंदू येतातच, तसेच मुसलमानही भक्तीभावाने येत आहेत म्हणून गोपाळ कृष्ण केतकर यांनी १९५२ साली याची नोंदणी ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नावाने केली. पेशवेकालीन इतिहास श्री मलंग गडाची नोंद आहे. त्यामध्ये श्री मलंग बाबा अशी नोंद सापडते.
  • मात्र कालांतराने या ठिकाणी मुसलमानांनी वर्चस्व दाखवणे सुरु केले. पूर्वापार हिंदू धर्म परंपरेने सुरु असलेल्या पूजाविधीवर मुसलमान आक्षेप घेऊ लागले, पुढे पुढे तर हिंदूंना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करू लागले. म्हणून मग हे देवस्थान मूलतः हिंदूंचेच आहे, असे सर्व ऐतिहासिक पुराव्यानिशी श्री अनंत गोखले यांनी १/१९८२ मध्ये ठाणे कोर्टात खटला दाखल केला आणि या देवस्थानाच्या ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नोंदणीलाच आव्हान दिले आहे.
  • हा खटला चालवू नये म्हणून नासिर खान फाजल खान यांनी उच्च न्यायालयात ६५०९/२००२ याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने त्यांना परत खाली ठाणे कोर्टात पाठवले, जिथे अनंत गोखले यांचा खटला सुरु आहे. हा खटला न्यायप्रविष्ट असतानाही नासिर खान फाजल खान यांनी या देवस्थानाची गैरमार्गाने वक्फ बोर्डात नोंदणी करून घेतली.
  • त्याला मदन बलकवडे यांनी ही नोंदणी चुकीची आहे म्हणून त्याविरोधात उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका दाखल केली. त्यात उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २००६ मध्ये वक्फ बोर्डाला या नोंदणीसाठी स्थगिती दिली. तसेच जोवर ठाणे कोर्टात प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नाही, तोवर या देवस्थानाच्या कारभारात लक्ष घालण्यास पूर्ण मनाई केली.
  • असे असूनही नासिर खान फाजल खान यांनी २००९मध्ये पुन्हा एकदा हे देवस्थान वक्फमध्ये रजिस्टर केले. वक्फनेही ते रजिस्टर करून त्याला प्रमाणपत्रही दिले. त्यावर मदन बलकवडे यांनी अवमान याचिका ५०८/२०१५ उच्च न्यायालयात दाखल केली. ती अजून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
  • अशा प्रकारे सध्या उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका, १७१८ हा अर्ज आणि ५०८/२०१५ हे तीन दावे प्रलंबित आहेत. तसेच १/१९८२चा खटला ठाणे कोर्टात प्रलंबित आहे.
  • तसेच २/२००९ हा अर्ज ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये या देवस्थानावर विश्वस्त नेमण्याची मागणी केली आहे. हा अर्ज सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाने करण्यात आला आहे. त्या अर्जावर आजवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अशा प्रकारे या देवस्थानाविषयी अनेक खटले विविध ठिकाणी प्रलंबित असतानाही स्थानिक मुसलमान त्याला दाद देत नाहीत. विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे ज्यांच्या नावाने अर्ज प्रलंबित आहे, ते एकनाथ शिंदे राज्य सरकारमध्ये महत्वाचे मंत्री असूनही धर्मादाय आयुक्त या अर्जाची दखल घेऊन विश्वस्त नेमण्यास तयार नाही.
  • श्री मलंग गडावर एक दीक्षा गादी आणि दोन समाधीस्थळ आहेत. ही हिंदूंची देवस्थाने आहेत हे सिद्ध करण्यासाठी सर्व इतिहासकालीन पुराव्यांसह खटले दाखल आहेत, जे प्रलंबित आहेत. परंतु यात प्रतिवादी नासिर खान  फाजल खान यांना ते मुसलमानांचे श्रद्धास्थान आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. त्यांनी फक्त ब्रिटिश गॅझेटचा आधार करून हे स्थान मुसलमानांचे असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.