Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण द्या अन्यथा … ; मनोज पाटील यांचा सरकारला इशारा

306
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण द्या अन्यथा ... ; मनोज पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. अशातच आज म्हणजेच शनिवार १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. “मराठा आरक्षण द्या अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार राहील” असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

केंद्र आणि राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू शकणार नाहीत. ५००० पुरावे मिळाल्याने आता आरक्षण समितीचे काम बंद करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले. तसेच सरकारकडे आणखी दहा दिवस आहेत, येथे आलेल्या लाखोंच्या जनसागराचे एकच मागणं आहे, मराठ्यांना आरक्षण (Manoj Jarange Patil) द्या.

(हेही वाचा – Israel -Palestine Conflict : हमासपुढे अल-कायदाचे क्रौर्य फिके; जो बायडेन यांचा कठोर घणाघात)

या दहा दिवसात आरक्षण पाहिजेच

जर तुम्ही या १० दिवसांमध्ये आरक्षण नाही दिले तर चाळीसाव्या दिवशी आम्ही सांगू पुढे काय करायचे. त्यानंतरच्या परिस्थितीला सरकार जबाबदार राहील, असा इशाराही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी दिला.

मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या

मनोज पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की; “कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्यावतीने विनंती आहे की, सर्वांनी मिळून मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्याचबरोबर ते म्हणाले की या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रासह राज्याने तातडीने निर्णय घ्यावा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.