Muslim : उत्तर प्रदेशात हमासचे समर्थन धर्मांध मुसलमानांना पडले महागात; मुख्यमंत्री योगींनी दिला दणका

118

एक दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मांध मुसलमानांना कडक इशारा दिला होता. सीएम योगी यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या दरम्यान धर्मांध मुसलमानांची (Muslim) धर्मांध कृती स्वीकारली जाणार नाही. तरीही काही मुसलमानांनी याकडे दुर्लक्ष करत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित मुसलमानांवर  गुन्हा दाखल केला.

मौलानाविरुद्ध गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूरच्या एका मौलानाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मौलानाने (Muslim) या पोस्टची दखल घेतल्यानंतर यूपी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दोन मुसलमान तरुणांवरही गुन्हा दाखल केला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इंस्टाग्रामवर या मुसलमान तरुणांनी पोस्ट केली होती. त्यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीती व्यक्त करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

(हेही वाचा छ Ind vs Pak : भारत – पाक सामन्यासाठी गुजरात पोलीस हाय अलर्टवर)

कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत दिल्या सूचना

इस्रायल-हमास युद्धादरम्यान हमास आणि पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश योगी आदित्यनाथ यांनी राज्य अधिकाऱ्यांना दिले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत भारत सरकारच्या विचारांच्या विरोधात कोणतीही कृती मान्य केली जाणार नाही, असे सांगितले होते.

अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली

विशेष म्हणजे इस्रायलने हमासला प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये केलेल्या बॉम्बस्फोटानंतर उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम (Muslim)  विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गटाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत निदर्शने केली होती. या संदर्भात विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या सर्व पोलीस अधीक्षकांना इस्रायलच्या मुद्द्यावर भारत सरकारच्या विचारांच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.