इस्त्रायलने हमासवरील (Israel-Palestine Conflict) हल्ले इतके तीव्र केले की, यात गाझा पट्टीच ताब्यात घेतली आहे. या हल्ल्यात हमासचा म्होरक्या ठार झाल्याचे इस्त्रायलच्या वृत्तपत्राने दिले आहे.
इस्रायल आक्रमक बनला असून गाझा पट्टीवर आणि हमासवर जोरदार आक्रमण करत आहे. तर, वेस्ट बँक येथील हमासच्या २३० जणांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. ७ ऑक्टोबरपासून इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक करत आहे. हमासचे एक हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायल आता गाझामध्ये त्याच प्रकारची कारवाई करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या वायू दलाचा मुख्य कमांडर ठार झाल्याची माहिती इस्रायलमधील एका वर्तमानपत्राने दिले आहे. इस्रायलने रात्रभर गाझा पट्टीत हवाई बॉम्बहल्ले केले आहेत. Israel-Palestine Conflict मध्ये या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाच्या प्रमुखाला ठार करण्यात आल्याची माहिती आहे. मुरदा अबु मुराद असे या हमास प्रमुखाचे नाव आहे. हमासचे दहशतवादी जेथून हवाई कारवाया करत होते, त्याच मुख्यालयास इस्रायलने लक्ष्य केले. दरम्यान, अबु मुरादने गेल्या आठवड्या झालेल्या नरसंहारात दहशतवाद्यांना कमांड देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
(हेही वाचा : Muslim : उत्तर प्रदेशात हमासचे समर्थन धर्मांध मुसलमानांना पडले महागात; मुख्यमंत्री योगींनी दिला दणका)
इस्रायलकडून घरात घुसून शत्रूला मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हमासने शेकडो इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने बॉम्बफेक थांबवली नाही तर ओलिसांना मारले जाईल, असे हमासने म्हटले आहे. पण हमासच्या धमकीनंतर इस्रायल आता ओलिसांची सुटका करण्यासाठी आपले विशेष युनिट ‘सायरेत मतकल’ मैदानात उतरले आहे. दरम्यान, इस्रायलची सायरेत मतकल ही जगातील सर्वात धोकादायक स्पेशल फोर्स मानली जाते.
Join Our WhatsApp Community