पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या विरोधात इस्रायलने जे युद्ध (Israel -Palestine Conflict) पुकारले आहे, त्यामध्ये गाझा पट्टी नेस्तनाबूत झाली आहे. या युद्धामुळे आता इस्त्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधावर परिणाम होऊ लागल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Israel -Palestine Conflict मुळे आता सौदी अरेबिया आपल्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार करत आहे. इस्रायल-हमासच्या हल्ल्यामुळेच सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात उच्च पातळीवर चर्चा सुरू आहे. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी गाझा पट्टीतील परिस्थितीबाबत फोनवर चर्चा केली. सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे चर्चा सुरु झाली होती, त्यांच्यात संबंध चांगले होऊ लागले होते, मात्र आता हमास विरोधात इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे याचे थेट परिणाम या संबंधावर होत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे उभय देशांमधील चर्चा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
(हेही वाचा : Israel -Palestine Conflict : इस्रायली नागरिकांनी ठेवला जगासमोर आदर्श; ‘हा’ व्हिडिओ होत आहे व्हायरल)
Join Our WhatsApp Community