सैन्यदलात नोकरी करण्याची इच्छेमुळे काही तरुणांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सदर्न कमांडच्या लायझन युनिट आणि कोंढवा (Pune Crime) पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे आरोपीला अटक करण्यात आली.
याप्रकरणी महेश पंढरीनाथ ढाके (३५, रा. मारुळ, पाटण, जि. सातारा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पांडुरंग कराळे (४५, रा. पाटील मळा, तासगाव, जि. सांगली) याच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Bhide Bridge : डेक्कन बसस्थानक ते भिडे पुल हा रस्ता दोन महिने बंद; जाणुन घ्या पर्यायी मार्ग )
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ही घटना घडली. पांडुरंग कराळेने सैन्य दलात वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे असून भरतीसाठी कोणी मित्र, नातेवाईक असतील तर सांगा, असे ढाके यांना सांगितले. त्यानंतर ढाके याने ही माहिती त्याच्या मित्रांना दिली. ढाकेने त्यांच्या मित्राच्या मुलाबाबत कराळेला विचारले असता त्याने एका उमेदवाराची भरती करायला ६ लाख रुपये लागतील. त्यानंतर ढाके यांच्या मित्राच्या मुलाने त्याच्या इतर मित्रांना हा प्रकार सांगितला. अशा प्रकारे ढाके यांनी ४२ तरुणांना भरतीसाठी पैसे देण्यात तयार केले. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून १ कोटी ८० लाख रुपये कराळेला दिले. त्यानंतर त्यांनी उमेदवार तरुणांना बेळगावला नेले. कराळेनेही त्यांच्याकडून भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे मागवली. कारळेच्या साथीदारांनी नोकरीनिमित्त आलेल्या तरुणांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर काही दिवसांनी परीक्षेचे बनावट वेळापत्रक ढाकेंना पाठवून ही भरती प्रक्रिया लवकरच होईल काळजी करू नका, असा निरोप दिला . बऱ्याच दिवसांपासून तो सतत परीक्षेची तारीख पुढे पुढे ढकलत होता. कराळे टाळाटाळ करत आहे, हे लक्षात येताच ढाके यांनी त्याला परीक्षेची तारीख कळवा किंवा पैसे परत करा, अशी ताकीद दिली. तरीही कराळे पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला.
ही टाळाटाळ बरेच दिवस सुरू होती. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे ढाके यांच्या लक्षात आले. याबाबत सदर्न कमांडच्या लायझन युनिटला माहिती दिली असता या पथकातील जवानांनी पांडुरंग कराळेचा शोध घेऊन आरोपी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी केलेल्या तपासात कराळेने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांकडून लाखो रुपये उकळून त्यांच्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन त्यांची फसवणूक केल्यामी माहिती उघड झाली आहे.
हेही वाचा –