World Cup 2023 : भारतीय संघाने उडवला बाबर सेनेचा धुव्वा

या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला.

160
World Cup 2023 : भारतीय संघाने उडवला बाबर सेनेचा धुव्वा
World Cup 2023 : भारतीय संघाने उडवला बाबर सेनेचा धुव्वा

भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करण्यात भारतीय संघ सलग आठव्यांदा यशस्वी झाला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्डकप २०२३ मध्ये झालेल्या लढतीत पाकिस्तानवर ७ विकेटनी विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. गोलंदाजांनी केलेली शानदार कामगिरी आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८६ धावा हे भारताच्या विजयाची मुख्य वैशिष्टे ठरली.रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर १९२ धावांचे आव्हान ३०.३ षटकात सहज पार केले. (World Cup 2023)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगली सुरूवात केली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी शानदार कमबॅक केले. तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी ८२ धावांची भागिदारी वगळता पाकिस्तानच्या डावात फार भरीव योगदान कोणाला देता आले नाही. बाबरने ५० तर रिझवानने ४९ धावा केल्या. भारताच्या जलद आणि फिरकी गोलंदाजांनी केलेल्या आक्रमक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव फक्त १९१ धावांवर संपुष्ठात आला.विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात दमदार झाली खरी पण २३ धावांवर सलामीवीर शुभमन गिल बाद झाला. गिलने १६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ५६ धावांची भागिदारी करून पाया भक्कम केला. (World Cup 2023)

(हेही वाचा : World Cup 2023 : बाबर सेना २०० च्या आतच गुंडाळली , भारताची यशस्वी गोलंदाजी)

रोहित-विराट जोडी विजय मिळून देईल असे वाटत असताना विराट कोहली १६ धावांवर माघारी परतला. मात्र दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्माकडून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरूच होती. त्याने फक्त ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ज्यात ४ षटकारांचा समावेश होता.त्यानंतर रोहित शर्माने वनडे करिअरमधील ३२वे शतक पूर्ण करेल असे वाटत होते पण २२व्या षटकात तो बाद झाला. रोहितने ६३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८६ धावा केल्या. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.