सकाळी चहात आले ठेचून घातल्याशिवाय काही जण चहाच घेत नाहीत. यामुळे घशाला आराम मिळतो. आले पाक, आले वड्या खाल्ल्याने घशाच्या तक्रारी (Health Tips) दूर व्हायला मदत होते, आले-लिंबाच्या चाटणाने पचनविकार दूर होतात. एवढेच आल्याचे फायदे आपल्याला माहित असतात, पण आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करण्याचे गुणधर्म आल्यामध्ये आहेत. आल्याचा आहारात (Ginger health benefits) वापर केल्यास विविध आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात.
– आल्याच्या चाटणामुळे तोंडात लाळ जास्त प्रमाणात तयार होते.
– आलं खाल्ल्याने गॅसेस, अॅसिडिटी, अपचन यासारखे पोटाचे आजार कमी होतात.
– आलं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
– दररोज जेवणाआधी आल्याच्या तुकड्याला मीठ लावून चावल्याने भूक चांगली लागते आणि तोंडाला चव येते. अन्नाचे पचन होण्यास मदत होते.
-पित्ताचा त्रास होत असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस, एक चमचा पुदिन्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून चाटण तयार करावं, हे चाटण दिवसातून तीन वेळा केल्यास फायदेशीर ठरू शकते.
– कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांनी आलं खाणं फायदेशीर ठरतं.आलं खाल्ल्यामुळे रक्ताच्या गुळण्या होत नाहीत. रक्तप्रवाह सुधारायला मदत होते.
– रक्तदाबावर नियंत्रण राहण्यासाठी आले गुणकारी ठरते. ह्रदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी आहारात आल्याचा समावेश करावा.
– आल्याचे पाणी किंवा काढा घेतल्याने मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते.
Join Our WhatsApp Community