वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात्रज-कोंढवा (Pune) रस्त्यावर सकाळी व सायंकाळी ( Katraj-Kondhwa road every morning-evening) दोन-दोन तास अवजड वाहनांची ( Heavy traffic) वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करा, तसेच पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
शहरातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री पवार यांनी हे आदेश दिले. शहराच्या दक्षिण भागातील कात्रज-कोंढवा रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात असून, अपघाती मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही जागा मिळत नसल्याने रखडले आहे.
(हेही वाचा – Mumbai Crime : पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल )
कात्रज ते खडी मशीन चौक या चार किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये ट्रक, टँकर, डम्पर, कंटेनर अशा मोठ्या वाहनांचा समावेश आहे. अवजड वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीत भर पडत असून, छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी व सायंकाळी दोन-दोन तास अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community