IND vs PAK World Cup : यंदा जम्मू-काश्मीरमध्येही साजरा झाला भारताच्या विजयाचा जल्लोष; पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा पाकिस्तानवर मोठा विजय जम्मू-काश्मीरच्या रस्त्यावरही साजरा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या विजयचा जल्लोष साजरा होणे, हा कलम ३७० हटवल्याचा परिणाम आहे, अशी चर्चा आता चालू आहे.

183
IND vs PAK World Cup : यंदा जम्मू-काश्मीरमध्येही साजरा झाला भारताच्या विजयाचा जल्लोष; पहा व्हिडिओ
IND vs PAK World Cup : यंदा जम्मू-काश्मीरमध्येही साजरा झाला भारताच्या विजयाचा जल्लोष; पहा व्हिडिओ

टीम इंडियाने रविवारी (14 ऑक्टोबर) वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. (IND vs PAK World Cup) टीम इंडियाने सात गडी राखून मोठा विजय नोंदवला. रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत पाकिस्तानचा डाव अवघ्या 191 धावांत गुंडाळला. श्रेयस अय्यरनेही चांगली साथ दिली. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांची पुरेपूर दखल घेतली. भारताने सामना सहज जिंकला. तेव्हापासून देशात जल्लोषाचे वातावरण आहे. टीम इंडियाचा विजय होताच लोक रस्त्यावर आले. देशाच्या विविध भागात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला जात होता. (IND vs PAK World Cup)

(हेही वाचा – Monsoon Update : पुढील ४८ तासांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज)

जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकावून आनंद साजरा 

भारतीय संघाचा पाकिस्तानवर मोठा विजय जम्मू-काश्मीरच्या रस्त्यावरही साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी तिरंगा फडकवत ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय चाहत्यांनी उत्साहात साजरा केला. त्यांनी भरपूर फटाके फोडले. यावेळी काही लोक व्हिडिओ बनवतानाही दिसले. जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या विजयचा जल्लोष साजरा होणे, हा कलम ३७० हटवल्याचा परिणाम आहे, अशी चर्चा आता चालू आहे. देश जिंकल्याचा आनंद आहेच; तो आनंद जम्मू काश्मीरमधील भारतीय साजरा करू शकत आहेत, हा दुहेरी आनंद या निमित्ताने दिसून आला.  (IND vs PAK World Cup)

पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाने भारतीय चाहते खूप उत्साहित आहेत. आज भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. रोहित शर्माने कर्णधारपदाची शानदार खेळी खेळली. आम्हाला भारत आणि पाकिस्तानचा अंतिम सामनाही पाहायचा आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांतही चालू आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू होता. या स्टेडियमची क्षमता एक लाखाहून अधिक आहे. संपूर्ण स्टेडियम भारतीय चाहत्यांनी भरले होते. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर येथील प्रेक्षक खूपच आनंदी दिसत होते. (IND vs PAK World Cup)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.