Kolhapur Mahalakshmi : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ; पाळली जाते ‘ही’ अनोखी परंपरा

कोल्हापूरमध्ये घटस्थापना विधी पूर्ण झाला, हे भाविकांना कळण्यासाठी घटस्थापनेनंतर तोफेची सलामी देण्याची प्रथा आहे.  तोफेची सलामी दिल्यानंतरच घटस्थापना झाली, हा संदेश करवीर नगरीमध्ये पोहोचतो.

122
Kolhapur Mahalakshmi : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ; पाळली जाते ही अनोखी परंपरा
Kolhapur Mahalakshmi : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ; पाळली जाते ही अनोखी परंपरा

देशभरात नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. (Kolhapur Mahalakshmi) विविध मंदिरांमध्ये, तसेच घरोघरी घटस्थापनेची लगबग दिसून आली. राज्यातील प्रमुख मंदिर असलेले आणि साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही नवरात्रोत्सवाला आरंभ झाला. मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक अशी रोशणाई करण्यात आली आहे. दरवर्षी नवरात्रीत लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. अनेक भक्त दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. (Kolhapur Mahalakshmi)

(हेही वाचा – Samriddhi Highway Accident : ‘त्या’ अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा)

घटस्थापनेनंतर तोफेची सलामी   

येथे घटस्थापना विधी पूर्ण झाला, हे भाविकांना कळण्यासाठी घटस्थापनेनंतर तोफेची सलामी देण्याची प्रथा आहे.  तोफेची सलामी दिल्यानंतरच घटस्थापना झाली, हा संदेश करवीर नगरीमध्ये पोहोचतो. ती सलामीची आज सकाळी ९ वाजता देण्यात आली.

दरम्यान मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा होणार आहे. रविवारी प्रतिपदेला पारंपारीक बैठी पूजा पार पडेल, सोमवारी द्वितीयेला महागौरी पूजा, मंगळवारी तृतीयेला कामाक्षीदेवी पूजा, बुधवारी श्री कुष्मांडादेवी पूजा, गुरूवारी पारंपरिक गजारूढ पूजा, षष्ठीला श्री मोहिनीअवतार पूजा, शनिवारी श्री नारायणी नमस्तुते पूजा, अष्टमीला पारंपरिक महिषासुरमर्दिनी पूजा, सोमवारी दक्षिणामूर्ती रूपिणी पूजा होणार आहे.

अष्टमीला मंदिराभोवती रांगोळ्यांनी रस्ते सजवले जाणार आहेत. देवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवून आकर्षक रोषणाईत शहर प्रदक्षिणा केली जाईल आणि शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीची पालखी कोल्हापूरच्या दसरा चौकात पोहोचेल. तिथे श्रीमंत राजर्षी शाहू महाराज घराण्याशी संबंधित घराण्याचे वारस पारंपारीक वेशभूषेत देवीची पूजा करतील. नंतर सीमोल्लंघन केले जाईल. हा दसरा उत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. हा पारंपारीक सोहळा पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. (Kolhapur Mahalakshmi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.