राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सावाला प्रारंभ झाला आहे. (Navratri Festival 2023) राज्यातील साडेतीन शक्तिपीठे कोल्हापूर, तुळजापूर, वणी, माहूर यांसह देवीच्या विविध मंदिरांचा परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.
तुळजापूर येथे 6 ऑक्टोबरपासून प्रारंभ
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातही शारदीय नवरात्र महोत्सवाला आरंभ झाला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाची एक विशेष ओळख आहे. येथे तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 6 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. ६ ऑक्टोबर या दिवशी देवीची मंचकी निद्रा चालू झाली. १५ ऑक्टोबर पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिर समितीच्या वतीने 6 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव कालावधीत साजर्या केल्या जाणार्या विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. (Navratri Festival 2023)
(हेही वाचा – ED Raid : राज्यभरात ईडीची धडक कारवाई; बापरे! ‘इतक्या’ कोटींच्या मालमत्ता जप्त)
माहूर गडावर नवरात्रीचा उत्साह
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगात रेणुकादेवीचे मंदिर आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. येथे घटस्थापनेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी दिसून आली.
सप्तशृंगी गडावर उत्साहात प्रारंभ
साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धपीठ असलेल्या नाशिक सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी श्री सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट कार्यालयात ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांच्या सहपत्नीक देवीच्या दागिन्यांची विधिवत पूजा व वर्दी दक्षिणा पार पडली. त्यानंतर पारंपरिक संबळ व ढोल ताश्यांच्या गजरात देवीच्या दागिन्यांची मिरवणूक काढण्यात आली. देवी मंदिरात पुजारी व पुरोहितांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. (Navratri Festival 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community