रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोरोक्कोने सर्वोच्च सेंट्रल बँकर हा जागतिक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. सप्टेंबरमध्ये, शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड २०२३मध्ये ‘A+’ रेटिंग मिळाले. RBI ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शक्तीकांता दास यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे. यापूर्वी, शक्तिकांता दास यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मॅगझिनने जूनमध्ये लंडनमधील सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले होते. (RBI)
RBI ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शक्तीकांत दास यांचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे.
वार्षिक सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्डमधील सर्वोच्च रँक अशा गव्हर्नरांना दिले जाते ज्यांनी रणनीतीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मौलिकता, सर्जनशीलता आणि कठोर परिश्रम या बाबतीत चांगले प्रदर्शन केले आहे.दास यांच्याशिवाय स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर जे. जॉर्डन आणि व्हिएतनामचे गव्हर्नर गुयेन थी होआंग यांनाही A+ ग्रेड मिळाली आहे.
(हेही वाचा : Delhi earthquake : दिल्लीत दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के)
पीएम मोदींनी केले होते अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२३ मध्ये ‘A+’ रेटिंग मिळवल्याबद्दल शक्तीकांत दास यांचे अभिनंदन केले होते. पीएम मोदींनी लिहिले होते, ‘आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, जो जगात आपले आर्थिक नेतृत्व प्रतिबिंबित करतो. शक्तीकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासाला बळकट करत राहील.
हेही पहा –