CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे, ठाकरे समाजवादी युतीवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

आगामी निवडणुकीत समाजवादी आणि ठाकरे गटाने एकत्रित सामोरे जाण्याचं निश्चित झाले.

161
CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे, ठाकरे समाजवादी युतीवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे, ठाकरे समाजवादी युतीवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

गेल्या अनेक दशकापासून दुरावलेले समाजवादी विचारांचे पक्ष आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील अंतर कमी झालं आहे. उद्धव ठाकरेंनी समाजवादी विचारांच्या १५० निवडक नेत्यांसोबत चर्चा केली. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतले. तेव्हाच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व कळाले. बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे. या राज्यातील मतदारांचा विश्वासघात केला. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे. (CM Eknath Shinde)

आगामी निवडणुकीत समाजवादी आणि ठाकरे गटाने एकत्रित सामोरे जाण्याचं निश्चित झाले. तब्बल २ दशकांनंतर पुन्हा एकदा ठाकरेंनी धर्मनिरपेक्ष विचारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खेळ आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये. उद्धव ठाकरेंकडून बाकी अपेक्षा नाही. ते आता सगळ्यांशी युती करतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.त्याचसोबत ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्या लोकांना बाळासाहेबांनी जवळ केले नाही. या सगळ्यांना हे जवळ करतील हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने केलेले काम आणि वर्षभरात राज्यात आम्ही करत असलेल्या विकासकामांना नक्की पोचपावती देतील. जनता मतदार सुज्ञ आहे. घरात बसलेल्या लोकांना जनता मतदान करणार नाही. रस्त्यावर उतरून विकासकामे करणाऱ्यालाच जनता मतदान करणार असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा : Navratri Festival 2023: यल्लमा देवीचे दर्शन ‘या’ नागरिकांना थेट घेता येणार, नवरात्रीनिमित्त सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनाप्रमुख मला नेहमी म्हणायचे, उद्धव एक लक्षात ठेव, केवळ तू लोकांना आवडावा म्हणून खोटा मुखवटा घालू नकोस. मी जसा आहे तसा आहे, एकतर स्वीकारा अन्यथा नकारा. मी त्यारितीने पुढे जातो. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे. आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती, तर विचारांची होती. आज आपण सगळे एकत्र जमलोय, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता एका वळणावर उभे आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.