ST BUS : ठाणे जिल्ह्यात लालपरीला आले सुगीचे दिवस, वर्षभरात वाढले सुमारे दीड लाख प्रवासी

नव्या बसेस आणि शासन योजनाचा प्रभाव

231
ST BUS : ठाणे जिल्हयात लालपरीला आले सुगीचे दिवस, वर्षभरात वाढले सुमारे दीड लाख प्रवासी
ST BUS : ठाणे जिल्हयात लालपरीला आले सुगीचे दिवस, वर्षभरात वाढले सुमारे दीड लाख प्रवासी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST BUS ) लालपरीला पुन्हा एकदा चांगले दिवस यावे यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या बसेसचीही खरेदी करण्यात आली आहे. प्रवासी संख्या वाढावी यासाठी महामंडळाने चांगलीच कंबर कसली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाच्या सन्मानार्थ शासनाने सुरू केलेल्या योजना तसेच नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित व ई-बसेस यांच्यामुळे ठाणे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवासींची संख्या चक्क लाखाच्या घरात वाढली आहे.

ठाणे विभागातून सन सप्टेंबर २०२२ मध्ये धावणाऱ्या बसेस मधून ४८ लाख ५८ हजार जणांनी लालपरीतून प्रवास केल्याची नोंद आहे. त्यातुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ठाणे विभागातून धावणाऱ्या बसेस मधून ५० लाख २ हजार जणांनी प्रवास केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. गतवर्षाच्या तुलनेत यंदा एक लाख ४४ हजार प्रवासी संख्या वाढली. म्हणजे दिवसाला ४ हजार ८०० प्रवासी वाढल्याचे ठाणे विभागाकडून सांगण्यात आले आहे. एसटी महामंडळाने आधुनिकतेकडे टाकलेली पाऊले आणि सरकारी योजनांमुळे पुन्हा एकदा लालपरी नागरिकांच्या पसंतीला उतरू लागल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा : Chandrakant Patil : विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये सोडवता येणार प्रश्नपत्रिका, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची घोषणा)

सध्याच्या घडीला ठाणे विभागाच्या आठ आगारातून ४५० रस्त्यावर धाव असून दिवसाला ३ हजार ५०० फेऱ्या त्या बसेसच्या होत आहेत. यामध्ये अडीच हजार फेऱ्या जिल्ह्यात तसेच एक हजार फेऱ्या लांब पल्ल्यावर होत आहेत. त्यातच दरवर्षी प्रमाणे यंदा गणेशोत्सवात भरघोस प्रतिसाद लाभला. मात्र मध्यंतरी खासगी वाहतुकीदारांनी लालपरीचा प्रवासी पळविण्यास सुरु केली होती. गेला प्रवासी पुन्हा कसा एसटीकडे यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली. तसेच महामंडळाकडून आटोकाट प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू केली गेली. पण, गेला प्रवासी ओढण्यासाठी पाहीजेल तसे यश मिळत नव्हते. याचदरम्यान देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक योजना सुरू झाली. त्यानंतर काही महिन्यातच एक महिला सन्मान योजना सुरू केली. त्यापूर्वी एसटीच्या बसेस बदलू लागल्या. नागरिकांना एसटीने आरामदायी आणि गारेगार प्रवास देण्यास सुरुवात केली. या बदल्या एसटी बसेसच्या रंगरूप आणि नागरिकांसाठी सुरू केलेल्या सन्मान योजनांनी आता एसटीचा प्रवासी पुन्हा एसटीकडे हळूहळू का होई ना ओढला जाऊ लागल्याचे पाहण्यास मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.