सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमधील दृष्यात असं दिसत आहे की, आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंचे आदरातिथ्य होत आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी खेळांडूंच्या खांद्यावर शाल पांघरून त्यांचे स्वागत केले जात आहे. त्यांना बिर्याणी खाऊ घातली जात आहे. याविषयी एका तरुणाने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
या तरुणाने पाकिस्तानी खेळाडूंचे भारतात मनोरंजन करण्यासाठी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अरिजित सिंग यांना आमंत्रित करून गरबा आयोजित केल्याबद्दल बीसीसीआयला (BCCI) फटकारले आहे. अनंतनागमध्ये तीन भारतीय सैनिक हुतात्मा होऊन एक महिनाही उलटला नाही. जो देश दहशतवाद्यांना पोसतो त्यांचाच देशातील खेळाडूंचा पाहुणचार केला जातो. शहीद कुटुंबियांच्या भावनांचा विचारसुद्धा केला जात नाही याविषयी या तरुणाने बीसीसीआयला प्रश्न विचारून फटकारले आहे.
(हेही वाचा – RPF : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन)
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओद्वारे इस्रायल-हमास युद्धाचा हवाला देत पॅलेस्टाईन दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणाऱ्या रिझवानवर आयसीसीने कारवाई का केली नाही, असा प्रश्नही या तरुणाने जनतेसमोर मांडला आहे. ICC ने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हातातून भारतीय लष्कराची स्वाक्षरी असलेले हातमोजे काढून टाकले होते. आयसीसीच्या संपूर्ण उत्पन्नापैकी 40 टक्के रक्कम बीसीसीआय घेते, असे म्हणत या तरुणाने बीसीसीआयवरही संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओद्वारे तो सांगतोय की, आम्हाला आमच्या सैनिकांच्या जीवाचे रक्षण जास्त महत्त्वाचे वाटते. या तरुणाने देशप्रेम व्यक्त करत बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे, पण त्याच्या अनेक प्रश्नांबाबत बीसीसीआयने मात्र मौन बाळगले आहे.
Join Our WhatsApp Community