किनारी रस्ता प्रकल्प (मुंबई कोस्टल रोड) अंतर्गत करण्यात आलेल्या भराव क्षेत्रावर, भुलाभाई देसाई मार्ग येथील अस्तित्वात असलेले सार्वजनिक वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत (Mahalakshmi Mandir) सहा मीटर रुंद आणि अंदाजे तीनशे मीटर लांबीचा नवीन पदपथ महापालिकेने बांधला आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना आपले वाहन सार्वजनिक वाहनतळ येथे उभे करून, पदपथाचा वापर करून ते मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. तसेच वृद्ध नागरिक व इतर गरजू व्यक्ती बॅटरी ऑपरेटेड कारचा वापर करून मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. सदर पदपथ आपत्कालीन परिस्थितीतही वापर करणे शक्य होणार आहे.
महानगरपालिकेने भुलाभाई देसाई मार्ग येथील अस्तित्वात असलेले सार्वजनिक वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत (Mahalakshmi Mandir) सहा मीटर रुंद आणि सुमारे तीनशे मीटर लांबीच्या बांधलेल्या पदपथाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले.
महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प) मंतय्या स्वामी, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, कार्यकारी अभियंता संजय पोळ, किनारी रस्ता प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ऋषिकेश पाटील, तसेच श्री महालक्ष्मी मंदीर (Mahalakshmi Mandir) न्यासाचे शेखर दांडेकर, विश्वस्त सुरेश डोंगरे, व्यवस्थापक नितीन कांबळी आणि इतर मान्यवर या लोकार्पण प्रसंगी उपस्थित होते.
(हेही वाचा – Mumbai Slum: उभ्या झोपडपट्टीतील दाहकता)
हा नवीन अतिरिक्त पदपथ नवरात्रोत्सवापूर्वी बांधून पूर्ण करण्याचे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी दिले होते. ही कालमर्यादा पूर्णपणे पाळून हा पदपथ भाविकांसाठी घट स्थापनेच्या मुहूर्तावर खुला करून दिलाबद्दल पालकमंत्री केसरकर यांनी महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले.
महानगरपालिकेमार्फत बांधण्यात येत असलेल्या किनारी रस्ता प्रकल्पाचा वापर करून महालक्ष्मी मंदिरामध्ये (Mahalakshmi Mandir) येणाऱ्या भाविकांना, मंदिरात सहजरित्या पोहोचता येईल अशा रितीने योग्य उपाययोजना करून मार्ग तयार करण्याचे निर्देश राज्याचे शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. तसेच मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरालगतच वाहनतळ अर्थात पार्किंगची सोय करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या होत्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community