Ind vs Ban : पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी पुण्यात पोहोचला तो क्षण 

शनिवारी पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केल्यानंतर भारतीय संघाने शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी थोडावेळ आरामच केला. आणि त्यानंतर आता संघ पुढील सामन्यासाठी पुण्यात पोहोचला आहे. 

129
Ind vs Ban : पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी पुण्यात पोहोचला तो क्षण 
Ind vs Ban : पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी पुण्यात पोहोचला तो क्षण 

ऋजुता लुकतुके

विश्वचषक स्पर्धेत (Ind vs Ban) तीन सलग विजय मिळवत भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आला आहे. हे विजयही ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान तसंच नुकताच इंग्लिश संघाला दणका देणाऱ्या अफगाणिस्तान विरोधातले होते. पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाने शनिवारी रात्री शांतपणे जेवण घेऊन नंतर आरामच केला.

पण, रविवारी दुपारी पुन्हा एकदा भारताची विश्वचषक मोहीम सुरू झाली. संघाचा पुढील सामना बांगलादेश विरुद्ध पुण्यातील गहुंजे स्टेडिअमला होणार आहे. आणि त्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. पाक बरोबरच्या विजयामुळे संघाचे चाहतेही खुश आहेत. आणि त्यांनी अगदी विमानतळापासून खेळाडूंच्या स्वागताची तयारी केली होती.

भारताचा बांगलादेश विरुद्धचा सामना येत्या गुरुवारी १९ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यासाठी खेळाडू पुण्यातील विमानतळावर उतरले तेव्हा चाहत्यांनी ‘इंडिया, इंडिया’ असा जल्लोष केला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहमदाबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारतीय गोलंदाजांची कामगिरी अप्रतिम झाली. त्यांनी पाकिस्तानला १९२ धावांमध्ये गुंडाळण्याचं मोठं काम केलं. महम्मद सिराजने बाबर आझमचा महत्त्वाचा बळी टिपल्यानंतर जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांनी टिच्चून गोलंदाजी करण्याबरोबरच दोन – दोन मोक्याचे बळीही मिळवले. आणि त्याच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानच्या मधल्या फळीत खिंडार पाडू शकला. पाकचे पुढचे ८ फलंदाज ३६ धावांमध्येच बाद झाले.

(हेही वाचा-Indian Air Force : ‘उत्तम’ आणि ‘अंगद’ वाढवणार भारताच्या हवाई दलाचं सामर्थ्य)

त्यानंतर १९३ धावांचं लक्ष्य पार करताना कर्णधार रोहीत शर्माने ६३ चेंडूंमध्ये ८३ धावांची खेळी साकारली. त्याखेरिज श्रेयस अय्यरनेही अर्धशतक करत भारताला विजय मिळवून दिला. भारताचे आता ३ सामन्यांतून ६ गुण झाले आहेत. गुरुवारी बांगलादेश विरुद्धही भारताला (Ind vs Ban) विजयाची आशा आहे.

भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली. श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवी जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, महम्मद सिराज व महम्मद शमी

बांगलादेश संघ – शकीब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तनझीद हसन तामीम, नजबुल हुसेन शांतो, तौहिद ह्रदय, मुश्फिकुर रहिम, महमद्गुला रियाद, मेहदी हसन मिराज, नसम अहमद, शक मेहदी, तसकिन अहमद, मुस्तफिझुर रेहमान, हसन मेहमूद, शोरिफूल इस्लाम व तनझीम हसन शकीब

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.