ऋजुता लुकतुके
एकदिवसीय विश्वचषकातला (Afghanistan Stuns England) सगळ्यात मोठा धक्कादायक विजय रविवारी नोंदवला गेला. अफगाणिस्ताने गतविजेत्या अफगाणिस्तानचा ६९ धावांनी निर्णायक पराभव केला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात अफगाण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
या विजयानंतर अफगाण खेळाडू भावूक होताना दिसले. संघाच्या विजयाचा शिल्पकार मुजिब उर रेहमानने हा विजय देशातील भूकंपात बळी पडलेल्या नागरिकांना समर्पित केला. तर अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानने, ‘देशातील लोकांसाठी क्रिकेट हा सध्या एकमेव दिलासा आहे,‘ या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भूकंपात १,००० बळी गेले आहेत. तर तिथली एरवीही अस्थिर असलेली राजकीय परिस्थिती पाहता लोकांना क्रिकेट किंवा कुठलाही खेळ हा एकमेव विरंगुळा वाटतो. तालिबानी राजवटीतून जात असलेल्या अफगाणिस्तानसमोर सध्या मोठी आर्थिक संकटं आवासून उभी आहेत.
या सगळ्या परिस्थितीत पिचलेले लोक क्रिकेटकडे आशेनं पाहत असल्याचं संघाला वाटतं. त्यामुळेच क्रिकेटपटूंनी इंग्लंड विरुद्धचा हा विजय मायदेशातील लोकांना समर्पित केला आहे.
(हेही वाचा-Afghanistan Upsets England : अफगाणिस्तानच्या इंग्लंडवरील विजयानंतर माजी खेळाडूंकडून संघावर कौतुकाचा वर्षाव )
‘गतविजेत्यांना विश्वचषकासारख्या स्पर्धेत हरवणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी आम्ही खूश आहोत. पण, याक्षणी संघातील एक खेळाडू म्हणून आणि संघ म्हणून आमच्या भावना मायदेशात भूकंपाशी झुंजणाऱ्या लोकांशी आहेत,’ अशा शब्दात मुजिब उर रेहमानने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुजिबला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने तळाला येऊन झटपट २८ धावा केल्या, ज्यामुळे अफगाण संघाला २७५ धावांचा टप्पा ओलांडता आला. आणि त्यानंतर त्याने महत्त्वाचे ३ बळीची टिपले. अनुभवी राशीद खाननेही तीन बळी टिपले.
अफगाणिस्तानचा संघ २०१५ पासून विश्वचषक स्पर्धेत खेळतोय. पण, संघाच्या नावावर पहिल्याच स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यातील विजय सोडला तर एकही विजय नव्हता. त्यांनी पहिल्या विजयानंतर सलग १४ सामने गमावले आहेत. पण, आता इंग्लंड विरुद्धच्या विजयाने संघाची पराभवाची मालिका खंडित झाली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community