Afghanistan Stuns England : अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर इंग्लिश कर्णधाराची पहिली प्रतिक्रिया

अफगाणिस्तानकडून बसलेल्या धक्क्यातून इंग्लिश संघ अजून सावरेला नाही. कर्णधार जोस बटलरने मात्र अफगाण संघ सगळ्याच बाबतीत सरस ठरल्याचं कबूल केलं

163
Afghanistan Stuns England : अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर इंग्लिश कर्णधाराची पहिली प्रतिक्रिया
Afghanistan Stuns England : अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर इंग्लिश कर्णधाराची पहिली प्रतिक्रिया

ऋजुता लुकतुके

रविवारी इंग्लंडच्या संघासमोर २८४ धावांचं आव्हान असताना इंग्लिश (Afghanistan Stuns England) संघ २१५ धावांमध्ये बाद झाला. संघाचा ६९ धावांनी पराभव झाला तो झालाच. शिवाय हा पराभव अफगाणिस्तानसारख्या स्पर्धेतील सगळ्यात नवख्या संघाकडून झाल्यामुळे तो जास्त जिव्हारी लागणारा ठरला.

या पराभवातून इंग्लिश खेळाडू अजून सावरलेले नाहीत. पण, कर्णधार जोस बटलरने मात्र प्रांजळपणे काही चुकांची कबुली दिली आहे. दिल्लीतल्या फिरोझशाह कोटला मैदानात अफगाणिस्तानने संपूर्ण वर्चस्व गाजवलं. आणि सगळ्याच बाबतीत अफगाण संघ इंग्लंडला भारी पडला ही पहिली कबुली बटलरने दिली.

‘आम्ही नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला पहिली फलंदाजी दिली. पण, त्यानंतर अफगाण फलंदाजांना रोखण्यात आम्ही कमी पडलो. पावणे तीनशेच्या वर धावा आम्ही देऊन बसलो, ही पहिली चूक झाली,’ सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना इंग्लिश कर्णधार म्हणाला.

(हेही वाचा-Mhada : म्हाडा कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठीची आता मुदत वाढवली , जाणुन घ्या कधीपर्यंत स्वीकारणार अर्ज)

आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लिश (Afghanistan Stuns England) फलंदाजांनी ज्या प्रकारे नांगी टाकली, त्यावर बटलर जास्त निराश झाला आहे. पण, पराभवाची कारणं त्याला द्यायची नाहीत. उलट तो म्हणतो, ‘असे पराभव लक्षात ठेवायला हवेत. यातून लवकर बाहेर पडा असं मी संघ सहकाऱ्यांना अजिबात म्हणणार नाही. उलट अशा पराभवांवर चिंतन करा. आणि त्यातून धडा घ्या,’ असंच सरळ चेहऱ्याने बटलरने सांगितलं.

अर्थात, पराभवाचा मोठा धक्का संघाला बसला असला तरी संघाच्या गुणवत्तेबद्दल कर्णधाराला शंका वाटत नाही. इथून पुढेही चांगला खेळ करून संघ स्पर्धेत आगेकूच करू शकतो, असा पक्का विश्वास त्याला आहे. पण, अफगाणिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर गुणतालिकेतही मोठा फरक पडला आहे.

आता ३ सामन्यात ६ गुण मिळवून भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय तो सरस धावगतीच्या आधारे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि दक्षिण आफ्रिकेची धावगती सरसच आहे. पण, संघ अजून दोनच सामने खेळलाय. त्यामुळे ४ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा संघ भारताबरोबरच्या पराभवानंतर गुणतालिकेत खाली सरकला होता. पण, आता ४ गुणांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. तर इंग्लिश संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.