छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांची वाहतूक १७ ऑक्टोबर (मंगळवार) रोजी तब्बल सहा तास बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाणार असल्यानं सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विमानांची ये-जा बंद राहणार आहे.अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे. (Mumbai Airport)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १७ ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ तात्पुरतं बंद करणे सीएसएमआयएच्या वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली देखभाल दुरुस्ती कामे करण्यात येतील.
(हेही वाचा : Mahila Bachat Gat : आठवडी बाजारासाठी प्रत्येक परिमंडळात लवकरच जागा)
काय आहे बंदच कारण
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे आणि १४/३२ हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील.” निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “सीएसएमआयए ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीत पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे.
हेही पहा –