Aapla Dawakhana : या महिन्यात आणखी ७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरिकांच्या सेवेत

174
Aapla Dawakhana : या महिन्यात आणखी ०७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरिकांच्या सेवेत
Aapla Dawakhana : या महिन्यात आणखी ०७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरिकांच्या सेवेत

सध्या आपला दवाखान्यांची संख्या ही १९४ पर्यंत पोहचली असून मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सेवेत ऑक्टोबर महिन्यात आणखी ०७ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची भर पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण १३ दवाखाने सुरु करण्याचे ध्येय होते, त्यापैकी ०६ दवाखाने सुरू झाले असून आणखी ०७ दवाखान्यांची भर महिना अखेरीपर्यंत पडणार आहे. या नव्या संख्येमुळे आपला दवाखान्यांच्या संख्येने २०० चा आकडा पार केला आहे. आतापर्यंत २३ लाख नागरिकांना आपला दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधांचा लाभ घेतला असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. (Aapla Dawakhana)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून आपला दवाखान्यांबाबत रचलेल्या जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफीतीचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  सोमवारी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा आणि डॉक्टर्स व अधिकारी वर्ग उपस्थित होता. (Aapla Dawakhana)

New Project 70

दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’च्या वर्षपूर्तीनिमित्त व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने ही ध्वनिफीत तयार करण्यात आली आहे. या ध्वनिफितीमध्ये असणाऱ्या जनजागृतीपर गीताचे शब्द हे गीतकार संदीप सुर्वे यांचे असून संगीत हे संगीतकार डॉ. संजयराज यांचे आहे. या गीताचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गीताच्या तीन गायकांपैकी डॉ. राहुल जोशी व डॉ. नेहा राजपाल हे वैद्यकीय डॉक्टर आहेत. याव्यतिरिक्त दिया वाडकर या चिमुकलीनेही या गाण्यामध्ये गायन केले आहे. (Aapla Dawakhana)

(हेही वाचा – Supreme Court : ‘गर्भाचे धडधडणे थांबवू शकत नाही…’ गर्भवती महिलेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना  त्यांनी, आरोग्याशी संबंधित सुविधा अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांनी अशा योजनांच्या निमित्ताने अभिप्राय देण्याची आता वेळ आहे, जेणेकरून या सुविधा अधिक चांगल्या प्रकारे नागरिकांना देणे सुलभ होईल. यासाठी आत आपला दवाखान्यांच्या ठिकाणी अभिप्राय पेटी ठेवण्यात येईल, अशी घोषणा उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. नागरिकांना आपला दवाखाना अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांचे अभिप्राय देता यावेत यासाठी दवाखान्यांच्या ठिकाणी सूचनापेटी ठेवण्यासोबतच अभिप्राय देण्याचीही सुविधा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Aapla Dawakhana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.