नाशिक पाठोपाठ मुंबई पोलिसांनी सोलापुरात कारवाई करून ११६ कोटी रुपये किमतीचा एमडीसह कच्चा माल जप्त केल्याची घटना सोमवारी (१६ ऑक्टोबर) घडली. नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात एमडी बनविण्याचे कारखाने आढळून आले असून येथून मोठ्या प्रमाणात एमडी या अमली पदार्थाची तस्करी सुरू होती अशी माहिती समोर येत आहे.सोलापुरात करण्यात आलेली कारवाई मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या युनिटने ही कारवाई केली आहे. (Nashik Drugs )
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने एमडी या अमली पदार्थाची डिलिव्हरीसाठी आलेल्या दोन जणांना खार परिसरातून अटक केली होती. या दोघीजवळ गुन्हे शाखेला १० कोटी १७ लाख रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ मिळून आला होता. या दोघांच्या चौकशीत सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात एमडी हा अमली पदार्थ तयार करून त्याची तस्करी केली जात असल्याचे समोर आले. (Nashik Drugs)
(हेही वाचा : Mumbai Police : कर्ज फेडण्यासाठी पोलीस बनला दरोडेखोर)
पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दया नायक आणि पथकाने सोलापूर येथील चिंचोली एमआयडीसी येथील कारखान्यावर छापा टाकून तयार करण्यात आलेला तीन किलो एमडी आणि एमडी तयार करण्यासाठी लागणारा १००कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी गेल्याच आठवड्यात नाशिक येथील शिंदे गावात असलेली एमडी तयार करण्याचा कारखाना उध्वस्त करून जवळपास ३०० कोटींचा एमडी आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करून १२जणांना अटक करण्यात आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community