Hero Electric AE47 : हिरोच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकचे फिचर आणि किंमत जाणून घ्या

हिरो इलेक्ट्रिक ओई ४७. हिरो इलेक्ट्रिक ही कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी वाहनं बनवणारी उपकंपनी २००७ पासून कार्यान्वित आहे.

140
Hero Electric AE47 : हिरोच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकचे फिचर आणि किंमत जाणून घ्या
Hero Electric AE47 : हिरोच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकचे फिचर आणि किंमत जाणून घ्या
  • ऋजुता लुकतुके

हिरोची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल येत्या जानेवारी महिन्यात बाजारात येतेय. कंपनीच्या या पहिल्याच मोटरसायकलची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊया. अलीकडचा जमाना हा इलेक्ट्रिक कार आणि ई-बाईकचा आहे. ई-बाईकमध्ये तर डिझाईनही पूर्णपणे बदलून गेली आहेत. दुचाकी वाहनांची देशातील एक जुनी उत्पादक कंपनी हिरो मोटर्स ई-बाईकच्या बाबतीत कशी मागे राहील. कंपनी आपली पहिली ई-मोटारसायकल नवीन वर्षी जानेवारी महिन्यात लाँच करणार आहे. (Hero Electric AE47)

ही नवीन ई-मोटरसायकल कशी असेल याची झलक कंपनीने २०२० च्या ऑटो एक्स्पोमध्येच दाखवून दिली होती. या नवीन ई-मोटरसायकलचं नाव आहे. हिरो इलेक्ट्रिक ओई ४७. हिरो इलेक्ट्रिक ही कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी वाहनं बनवणारी उपकंपनी २००७ पासून कार्यान्वित आहे आणि अलीकडे कंपनीचं ई-मोटरसायकलवर संशोधन सुरू होतं. हिरोची नवी ई-मोटरसायकल रेट्रो लुक असलेली आहे. तिचे हेडलाईट्स गोल आकाराचे आहेत. मोटरसायकलला आधुनिक डिजिटल डिस्प्ले आहे आणि बाईकचे सगळे कंट्रोल डिजिटल स्वरुपात असतील. शिवाय बाईकला सिम तसंच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे. आधुनिक जीपीएस यंत्रणाही बाईकमध्ये असेल. शिवाय असेल युएसबी चार्जर. बाईकमध्ये चालवण्याचे दोन मोड असतील. शिवाय रिव्हर्स यंत्रणाही आहे. (Hero Electric AE47)

(हेही वाचा – Mumbai Municipal Hospital : शिवडी टी. बी आणि कस्तुरबा रुग्णालयातील महत्वाचे वॉर्डही होणार फायर प्रूफ)

तांत्रिक दृष्ट्या या ई-मोटरसायकलमध्ये ४ किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक हब मोटर आहे. शून्य ते साठ किलोमीटरचा वेग फक्त ९ सेकंदात ही बाईक गाठू शकते असा कंपनीचा दावा आहे. आणि बाईकचा कमाल वेग आहे ताशी ८५ किलोमीटरचा. बाईकला इको आणि पॉवर असे दोन मोड आहेत. बाईकच्या वेगानुसार, हे मोड आपोआप निवडले जातील. एका चार्जमध्ये बाईक इको मोडमध्ये असताना १६५ किमी पर्यंतचा पल्ला गाठू शकेल. तर पॉवर मोडमध्ये ती ९५ किमी धावेल. या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत १,५०,००० ते १,७५,००० लाख रुपयांच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. आणि या मोटरसायकलची मुख्य स्पर्धा असेल ती रिव्होल्ट कंपनीच्या आरव्ही ४०० या इलेक्ट्रिक बाईकशी. (Hero Electric AE47)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.