Israel-Palestine Conflict : ४ वर्षाच्या चिमुरडीने रुग्णालयात डोळे उघडले; पण… इस्त्रायल-हमास युद्धाची ह्रदयद्रावक कहाणी

आमच्या कुटुंबात मी आणि माझी नात फुला हिच्याशिवाय कोणीही वाचले नाही.

179
Israel-Palestine Conflict : ४ वर्षाच्या चिमुरडीने रुग्णालयात डोळे उघडले; पण... इस्त्रायल-हमास युद्धाची ह्रदयद्रावक कहाणी
Israel-Palestine Conflict : ४ वर्षाच्या चिमुरडीने रुग्णालयात डोळे उघडले; पण... इस्त्रायल-हमास युद्धाची ह्रदयद्रावक कहाणी

इस्त्रायल-हमासच्या युद्धाचे (Israel-Palestine Conflict) परिणाम तेथील नागरिकांच्या जीवनावर होऊ लागले आहेत. येथील एका चार वर्षांच्या मुलीचा अनुभव अतिशय ह्रदयद्रावक (Heartbreaking Story) आहे. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या या ४ वर्षांच्या चिमुरडीने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा ती तिच्या आई-वडिलांचा शोध घेत होती, पण तिचं आयुष्यच पार बदलून गेलं होतं.

मिरर यूकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इस्त्रायल-पॅलेस्टाईनच्या युद्धात फुला अल-लहम नावाची एक ४ वर्षांची छोटी मुलगी जखमी झाली. त्यामुळे तिला खान युनूस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिच्या आसपास कोणीही नव्हते. ती इकडे तिकडे पाहात होती. आपल्या कुटुंबियांना शोधत होती, पण तिला कोणीही दिसले नाही. तिच्या कुटुंबात १४ जण होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. कुटुंबात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि भावाचा समावेश आहे. तिच्या कुटुंबात ती एकटीच वाचली आहे.

(हेही वाचा – Rabies Free Mumbai : मुंबईतील साडेचार हजार भटक्या मांजरांना, तर साडेनऊ हजार भटक्या कुत्र्यांना रेबिजची लस )

फुला अल-लहमची आजी उम-मोहम्मदने सांगितले की, अचानक कोणताही इशारा न देता दहशतवाद्यांनी घरात राहणाऱ्या लोकांवर बॉम्ब फेकला. आमच्या कुटुंबात मी आणि माझी नात फुला हिच्याशिवाय कोणीही वाचले नाही. ती काहीच बोलत नाही. फक्त पलंगावर पडून आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी घरे, रस्ते आणि कार्यक्रमांसह सर्वत्र लोकांना गोळ्या घातल्या. हत्येसोबतच दहशतवाद्यांनी लोकांना लुटले. त्यांची घरे जाळली. याशिवाय त्यांनी दीडशेहून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या इस्रायली नागरिकांची संख्या आतापर्यंत १३०० च्या पुढे गेली आहे. तर २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यात वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.