महाराष्ट्रातील बोली भाषांना प्राधान्य मिळाले पाहिजे याच हेतूने बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची सुरुवात झाली. प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले आणि २०१६ पासून ही स्पर्धा सुरु झाली. दोन वर्षांच्या कोविड काळानंतर तिकीट बुकींगने हाऊसफुल्ल झालेली ही पहिली एकांकिका स्पर्धा होती. (Boli Bhasha Ekankika Competition 2023)
मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचे बिगुल वाजले असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर अंतिम फेरी १२ जानेवारीला दादरमध्ये होणार आहे. (Boli Bhasha Ekankika Competition 2023)
(हेही वाचा – Pest Control : कीटकनाशकांच्या फवारणीसाठी परवाना बंधनकारक)
विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या बोलींमधून २४९ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असून प्रथम चार सांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००, १५००० व ५००० अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी पारितोषिके आहेत. (Boli Bhasha Ekankika Competition 2023)
५ ते ७ जानेवारी या कालावधीत तीन दिवस कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९९३०४६६९२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (Boli Bhasha Ekankika Competition 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community