अलाहाबाद उच्च न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी निठारी प्रकरणातील (Nithari Murder Case) दोषी मोनिंदरसिंग पंढेर आणि सुरेंद्र कोली यांची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष सुटका केली आहे. गाझियाबाद येथील विशेष सी. बी. आय. न्यायालयाने 2017 मध्ये या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयातील सुनावणी सप्टेंबर 2023 मध्ये पूर्ण झाली आणि निकाल राखून ठेवण्यात आला. त्यानंतर न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती सय्यद आफताब हुसेन रिझवी यांच्या खंडपीठाने म्हटले की, दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2005 ते 2006 दरम्यान उत्तर प्रदेशातील नोएडातील निठारी (Nithari Murder Case) भागात या दोन्ही दोषींनी अमानवी कृत्य केले. त्यानंतर सीबीआयच्या तपासमधून निठारी हत्याकांड हे प्रकरण उघडकीस आले.
(हेही वाचा – October Heat : राज्यातील विजेची मागणी वाढली)
Nithari case: Allahabad High Court has acquitted convicts Surendra Koli in 12 cases and Moninder Singh Pandher in 2 cases in which they were awarded the death penalty
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 16, 2023
काय आहे निठारी हत्याकांड?
उत्तर प्रदेशातील नोएडा (Nithari Murder Case) भागातील तरुण मुलं-मुली अचानक गायब होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हा सगळं भुताटकीच्या भाग असल्याचं स्थानिकांचं म्हणणं होता. मात्र एका दिवशी अचानक मोनिंदर पंढेर घरा शेजारील नाल्यामधून मुलांच्या शरीराचे तुकडे मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सीबीआयने चौकशी केल्यानंतर या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. सुरिंदर कोली हा मोनिंदर पंढेरच्या घरी मदतनीस म्हणून काम करायचा. तो मुलांना घरात घुसण्याचे आमिष दाखवायचा, त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते तुकडे नाल्यात फेकायचा. पुरावे नष्ट करण्यासाठी ते मुलांचे मृतदेह कापून नाल्यात टाकतील असे पोलिसांनी सांगितले. (Nithari Murder Case)
पोलिसांनी सांगितले की आणखी अनेक मुलांच्या भीषण हत्यांची (Nithari Murder Case) मालिका त्या भागात सुरु होती, ज्यानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले (CBI). 2007 मध्ये सीबीआयने पंढेर आणि कोली यांच्याविरोधात 19 गुन्हे दाखल केले.
सुरिंदर कोलीला त्याच्या मालकाच्या घरी अनेक मुलांवर बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले. कोलीने यापूर्वी मृत पीडितांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याची आणि त्यांच्या शरीराचे अवयव खाल्ल्याची कबुली दिली होती. (Nithari Murder Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community