Israel-Palestine Conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्त्रायलमध्ये दाखल, युद्ध सुरू असतानाच केला दौरा

स्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जो बायडन यांना आमंत्रित केलं होतं.

140
Israel-Palestine Conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्त्रायलमध्ये दाखल, युद्ध सुरू असतानाच केला दौरा
Israel-Palestine Conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्त्रायलमध्ये दाखल, युद्ध सुरू असतानाच केला दौरा

स्राइल आणि हमासमध्ये (Israel-Palestine Conflict) ११ दिवसापासून युद्ध चालू आहे. या युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची स्थिती निर्माण झाली असून यात हजारो लोकांची मृत्यू झालाय. इस्राइलच्या हवाई दलाने गाझा पट्टीवर घेराव घातलाय. याचदरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे इस्राइलमध्ये दाखल झाले आहेत. बायडन आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट होणार आहे. त्यानंतर कदाचित युद्धाची दिशा निश्चित होणार आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : दहशतवाद्यांनी नागरिकांच्या केलेल्या क्रूर हत्येचा व्हिडियो व्हायरल )

युद्ध चालू असताना बायडन यांचा इस्राइल दौरा जोखीम असलेला दौरा आहे. दरम्यान या अमेरिकेने इस्राइलला पाठिंबा दिला असून अमेरिकेची वचनबद्धता दाखवण्यासाठी आणि मध्यपूर्वीमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी बायडन यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. दरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जो बायडन यांना आमंत्रित केलं होतं. दरम्यान बायडन हे अम्मान, जॉर्डन येथेही जातील. ते येथे मॅजेस्टी अब्दुल्ला, इजिप्शियन राष्ट्राध्यक्ष सिसी आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचीही भेट घेणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.