Israel-Palestine Conflict : २ हजार अमेरिकन सैनिक इस्त्रायलमध्ये अलर्ट मोडवर, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा आदेश

इस्त्रायलच्या मैत्रीमुळे अमेरिका इस्त्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे.

133
Israel-Palestine Conflict : २ हजार अमेरिकन सैनिक इस्त्रायलमध्ये अलर्ट मोडवर, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा आदेश
Israel-Palestine Conflict : २ हजार अमेरिकन सैनिक इस्त्रायलमध्ये अलर्ट मोडवर, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचा आदेश

गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेलं इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार, सैनिक आणि युनिट्सना अलर्ट आल्याचे आदेश अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन (US Secretary of Defense Lloyd Austin) यांनी दिले आहेत.

अमेरिका इस्त्रायलची साथ सोडणार नाही. या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्त्रायलच्या (Israel-Palestine Conflict) पाठीशी आहे, असे आश्वासनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन (US President Biden) यांनी इस्त्रायलला दिले आहे.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : इस्त्रायल-हमास युद्ध भडकण्याची शक्यता, इराणने दिला जोरदार इशारा)

या हल्ल्याबाबत एकता दर्शवण्यासाठी आपण इस्त्रायलला जात असल्याची माहितीही बायडेन यांनी दिली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या मैत्रीमुळे अमेरिका इस्त्रायलला शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवत आहे, अशा स्थितीत इस्त्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वी जोपर्यंत अमेरिका आहे तोपर्यंत ते इस्त्रायलच्या पाठिशी उभे राहतील, असे बायडेन सरकारचं म्हणणं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.