Versova CWC School : वर्सोवातील ‘त्या’ शाळेत संस्था चालकांकडून महापालिकेच्या भाडेकराराचा भंग, पोलिस ठाण्यात नोंदवला एफआयआर

महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही

155
Versova CWC School : वर्सोवातील 'त्या' शाळेत संस्था चालकांकडून महापालिकेच्या भाडेकराराचा भंग, पोलिस ठाण्यात नोंदवला एफआयआर
Versova CWC School : वर्सोवातील 'त्या' शाळेत संस्था चालकांकडून महापालिकेच्या भाडेकराराचा भंग, पोलिस ठाण्यात नोंदवला एफआयआर

वर्सोवा गाव येथील महापालिकेने भाडे करारावर दिलेल्या भूखंडावर उभारलेल्या चिड्रेन वेल्फेअर सेंटरच्या संस्था चालकांविरोधात मुंबई महापालिकेने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. महापालिकेने भाडेकरारावर दिलेल्या या भूखंडाच्या कराराचा भंग केल्याचे आढळून आल्याने महापालिकेने हा एफआयआर दाखल केला आहे. या शाळेच्या संस्थेविरोधात खासदार तसेच आमदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शाळेच्या वास्तूची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यात सब लिज तसेच अनधिकृत बांधकामासह अग्निशमन दलाची कोणतीही एनओसी न घेतल्याने हा प्राथमिक गुन्हा नोंदवला असून लवकरच या शाळेच्या संस्था चालकांना आपला भाडेकरार रद्द का करू नये याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (Versova CWC School)

अंधेरी पश्चिम येथील वर्सोवामधील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित भूखंड महापालिकेने सन २००१मध्ये चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर या संस्थेला भाडेतत्वावर दिला होता. महापालिकेच्या भूखंडावर उभ्या राहिलेल्या शाळेत मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले असून महापालिकेच्या कराराचाही भंग केल्याची तक्रारी वर्सोवा येथील आमदार भारती लव्हेकर आणि खासदार राहुल शेवाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी स्वरुपात केली होती. या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी या शाळेची संयुक्त स्थळ पाहणी करून त्वरीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी के पश्चिम विभागाचे अधिकारी, मालमत्ता विभागाचे अधिकारी, इमारत प्रस्ताव विभागाचे अधिकारी व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यात ज्या अटी व शर्तीवर हा भूखंड भाडेतत्वावर देण्यात आला होता, त्या अटी व शर्तीचे संस्था चालकांनी मोठ्याप्रमाणात उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम केले असून काही ठिकाणी बांधकाम सुरु असल्याचेही निदर्शनास आल्याचे पोलिस एफआयआरमध्ये म्हटले आहे. (Versova CWC School)

(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : आता गावागावात कुशल मनुष्यबळ तयार होणार)

चिड्रेन वेल्फेअर सेंटरला हा भूखंड दिलेला असताना त्यांनी तळ मजल्याची जागा फैरी लँड शाळेला सब लिजवर दिली आहे. तसेच संपूर्ण भूखंड हा माध्यमिक शाळेच्या हेतुसाठी दिलेला असताना तसेच यावर माध्यमिक शाळेचे आरक्षण असतानाही या भूखंडावर ज्युनिअर केजी ते ज्युनिअर कॉलेज तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय काढून एकप्रकारे महापालिकेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे. तळ मजल्यावर अनधिकृत बांधकाम तसेच अनधिकृत बदल तसेच मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम करताना इमारत प्रस्ताव विभागाच्या मंजुर आराखड्या व्यतिरिक्त मुळ बांधकामाच्या रचनेत मोठा बदल आणि अग्निशमन दलाच्या एनओसी व्यतिरिक्त हे बांधकाम सुरु असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. शिवाय महापालिकेच्या परवानगीशिवाय अनधिकृत भिंत पांडून शेजारील खेळाच्या मैदानात प्रवेश करण्याचा मार्ग काढला आहे. तसेच महापालिकेच्या परवानगी शिवाय महापालिकेच्या मालकीचा शाळेच्या जवळचा भूखंड शाळेचा भाग म्हणूनच वापर केला जात आहे. त्यामुळे या भाडेकराराचा भंग आणि अनधिकृत बांधकाम यामुळे महापालिकेने वर्सोवा पोलिस ठाण्यात संबंधित संस्था चालकांविरोधात १५ ऑक्टोबर २०२३ रोजी एफआयआर दाखल केला आहे. या अनधिकृत बांधकामप्रकरणी संस्थेला महापालिकेने ३५४ची नोटीस जारी केली आहे. (Versova CWC School)

याबाबत मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या शाळेबाबत तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थळ निरिक्षण करत आपला अहवाला सादर केला आहे. त्यात बऱ्याचप्रमाणात कराराचे उल्लंघन तसेच अनधिकृत बांधकाम झाल्याचे अहवालात नमुद केले आहे. याबाबत शिक्षण विभागाकडूनही अहवाल मागवला असून त्यांच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थेला आपला करार रद्द का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Versova CWC School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.