सध्या ऑक्टोबर हिट आहे. त्यामुळे उन्हाचा तीव्र कडाका जाणवत आहे. त्यामुळे भर उन्हात घराबाहेर पडलं की, चेहरा टॅन होण्याची शक्यता आहे. अशा वेळी चेहऱ्याची (Beauty Tips) व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे चेहरा चमकदार आणि मुलायम दिसायला मदत होईल. याकरिता काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता.
स्क्रब (scrub)
चेहरा स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. याकरिता बदामाचा वापर करू शकता. पुदिना आणि दह्याच्या पेस्टने चेहऱ्याला स्क्रब केल्यामुळे चेहरा उजळायला मदत होईल. चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. त्यानंतर पेस्ट सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
उटणं
उटणं लावल्यामुळे चेहरा मुलायम व्हायला मदत होईल. यासाठी घरी तयार केलेल्या उटण्याचाही वापर करू शकता.
मास्क (Mask)
मास्क तयार करण्यासाठी मसूर डाळ, दही आणि गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या. यामुळे चेहरा चमकदार व्हायला मदत होईल.
घरच्या घरी उटणं कसं तयार कराल?
उजळ, चमकदार, मुलायम त्वचेसाठी घरच्या घरी उटणं तयार करू शकता. याकरिता २ चमचे बेसन पीठ, २-३ चमचा दही, चिमूटभर मीठ एकत्र करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच राहू द्या. सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.