PM Narendra Modi : भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केली अमृतकाल व्हिजन २०४७ ची घोषणा

प्रामुख्याने तीन दिवसांची तिसरी परिषद मंगळवारपासून वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानात सुरू झाली.

113
PM Narendra Modi : भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केली अमृतकाल व्हिजन २०४७ ची घोषणा
PM Narendra Modi : भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केली अमृतकाल व्हिजन २०४७ ची घोषणा

लवकरच प्रवासी समुद्री पर्यटन व क्रुझ क्षेत्रातही भारत हा जागतिक हब होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामध्ये मुंबईत उभ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचा हातभार मोलाचा असेल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (१७ ऑक्टोबर) जागतिक भारतीय सागरी परिषेदत (जीएमआयएस) व्यक्त केला. त्या वेळी त्यांनी २०४७ पर्यंत सागरी व्यापाराद्वारे भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी ‘अमृतकाल व्हिजन २०४७’ची घोषणा केली आहे.

भारत बंदर विकास, जहाज बांधणी, जहाज पुनर्वापरातील क्षमतावाढ, जलमार्गांद्वारे प्रवासी वाहतूक याद्वारे सागरी क्षेत्रात आघाडीवर जाणार आहे. प्रामुख्याने तीन दिवसांची तिसरी परिषद मंगळवारपासून वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानात सुरू झाली. केंद्रीय बंदर विकास व जहाज बांधणी मंत्रालयासह ‘फिक्की’ या संस्थेने परिषदेचे आयोजन केले आहे. पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाल की ‘भारत हा झपाट्याने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. ते लक्ष्य अत्याधुनिक मोठी बंदरे, आंतरराष्ट्रीय कंटेनर हाताळणी पायाभूत सुविधा, बेटांचा विकास, देशांतर्गत जलमार्ग विकास व मल्टिमॉडेल हब याद्वारे गाठता येईल. (PM Narendra Modi)

सागरी सुविधांच्या विकासातून उद्योगांच्या खर्चात कपात होते, त्यातून दळणवळण क्षमता वाढते व मोठ्या प्रमाणावर रोजगाराला चालना मिळते. भारतात यादृष्टीने होणारा विकास हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे.’आयएनएस विक्रांत’ देशाच्या सामर्थ्याचे व भारतीय जहाजबांधणी क्षेत्रातील कौशल्याचे प्रतीक आहे. लवकरच जहाज बांधणीत आपण देशाला आघाडीवर घेऊन जाऊ यात शंका नाही. येणाऱ्या काळात देशात अनेक ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्ती हब उभे होतील’ असेही पंतप्रधानांनी सांगितले.

(हेही वाचा : RBI Fine : RBI ची मोठी कारवाई, ‘या’ दोन मोठ्या खासगी बँकेला ठोठावला ‘इतक्या’ कोटींचा दंड)

परिषदेला केंद्रीय बंदरे विकासमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, शंतनू ठाकूर, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद नाईक यांच्यासह जेएनपीए, मुंबई बंदर प्राधिकरण, महाराष्ट्र मॅरिटाइम बोर्ड, केंद्रीय सचिव, जहाज क्षेत्राचे महासंचालक हेदेखील उपस्थित होते. मान्यवरांनी दिवसभर विविध चर्चासत्रात भारतीय समुद्री व बंदर क्षेत्राची माहिती मांडली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.