Congress vs I.N.D.I.A. Alliance : इंडिया आघाडीतील तीन पक्षांचा काँग्रेस विरोधात ‘एल्गार’

आघाडीतील तीन-तीन मोठ्या पक्षांनी काँग्रेसच्या विरोधात तलवार उपसली आहे.

170
Congress vs I.N.D.I.A. Alliance : इंडिया आघाडीतील तीन पक्षांचा काँग्रेस विरोधात 'एल्गार'
Congress vs I.N.D.I.A. Alliance : इंडिया आघाडीतील तीन पक्षांचा काँग्रेस विरोधात 'एल्गार'

भारतीय जनता पक्षाविरूध्द एकजूट झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील नाराज पक्षांची हनुमानाच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस लांब होत चालली आहे. महत्वाचे म्हणजे, आघाडीतील तीन-तीन मोठ्या पक्षांनी काँग्रेसच्या विरोधात तलवार उपसली आहे. यात आणखी पक्षांची भर पडण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक भाजपविरूध्द एकजुटीने लढण्यासाठी एकत्र झालेल्या इंडिया आघाडीत आतापासूनच फूट पडायला सुरुवात झाली आहे. आघाडीची चर्चा अद्याप जागा वाटपापर्यंत पोहचलेली नाही. मुळात आघाडीतील पक्ष काँग्रेसच्या मनमानीला कंटाळले असल्याची चर्चा ऐकिवात आहे. (Congress vs I.N.D.I.A. Alliance)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आधीपासून काँग्रेसवर नाराज आहेत. यात आता भर पडली आहे ती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची. काँग्रेस पक्ष सर्व पक्षांवर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. आघाडीतील नेत्यांना हीच बाब फार खटकत आहे. महत्वाचे सांगायचे म्हणजे, पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली आणि उत्तरप्रदेश या चारही राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नाहीच्या बरोबर आहे. यानंतरही काँग्रेस या राज्यांतील पहिल्या क्रमांकाच्या पक्षांना गृहित धरीत आहे. पश्चिम बंगाल (४२), पंजाब (१३), दिल्ली (७) आणि उत्तरप्रदेश (८०) या राज्यांत लोकसभेच्या १४२ जागा आहेत. काँग्रेसचे अस्तित्व सुध्दा नाही. तरीसुध्दा काँग्रेस स्थानिक पक्षांना बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. (Congress vs I.N.D.I.A. Alliance)

(हेही वाचा – Ind vs Ban : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहीत शर्माने केली नेट्समध्ये गोलंदाजी)

यामुळे ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंतसिंग मान आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसविरूध्द बंड पुकारले आहे. यूपीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय रॉय यांच्या वक्तव्यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये निर्माण झालेली दरी आणखी वाढली आहे. रॉय म्हणाले की, ‘काँग्रेस पक्ष कुणाच्याही भरोश्यावर नसून यूपीत सर्व ८० जागा लढविण्यास सक्षम आहे’. यास अखिलेश यादव यांनी सुध्दा चोख प्रत्यूत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘आघाडी देश पातळीवर आहे की राज्य पातळीवर हे काँग्रेसने स्पष्ट करावे. आघाडी राष्ट्रीय पातळीवर आहे आणि राज्य पातळीवर नाही असे असेल तर ठीक आहे. भविष्यातही आघाडी राज्य पातळीवर होणार नाही’. (Congress vs I.N.D.I.A. Alliance)

उत्तरप्रदेशात सपाशी आघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने मध्यप्रदेशच्या निवडणुकीत सपाला सोबत घ्यावे अशी यादव यांची इच्छा होती. या संदर्भात चर्चा सुध्दा झाली होती. परंतु, काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसत सपासाठी सोडलेल्या जागेवरही आपले उमेदवार उतरविले. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील निवडणूक इंडिया आघाडीच्या एकजुटतेची पहिली परिक्षा होती. यात आघाडी पूर्णपणे विखुरली असल्याचे दिसून येत आहे. मध्यप्रदेशात सपा नाराज झाली आहे, तर राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकदल सुध्दा काँग्रेसवर नाराज आहे. बंगालमध्ये कोणत्याही पक्षाशी आघाडी होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष अधिर रंजन चौधरी वारंवार बोलून दीदींना डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. (Congress vs I.N.D.I.A. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.