Devendra Fadanvis : अद्याप कुणीही काही मागितले नाही जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ – देवेंद्र फडणवीस

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर दावा केला आहे

140
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदीत बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदीत बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण

कुणी काहीही मागितलं नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) दिली आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे (Shiv Sena) गटाने २२ जागांवर दावा केला आहे. त्यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार राहुल शेवाळ यांनी लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागा आपल्याला मिळाव्यात असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजून जागावाटपाची चर्चा झाली नाही, तीनही पक्ष एकत्रित बसू आणि निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, यावर आम्ही तीनही पक्ष एकत्रित बसू आण जागावाटपाचा निर्णय घेऊ. अद्याप कुणीही काहीही मागितलं नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ.

(हेही वाचा : Operation Jeevan Rekha : रेल्वे सुरक्षा दलाने वाचवली ‘इतक्या’ जणांची जीवनरेखा)

शिवसेना शिंदे गटाने ४८ पैकी २२ जागांवर दावा केला आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी १३ खासदार आहेत त्या १३ जागा भाजप सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातंय. पण सत्तेत अजित पवार सामील झाल्यानंतर त्यांनाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे ४८ जागांचे वाटप कसं करायचं हा प्रश्न आहे. भाजपने राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.