Veer Savarkar : वीर सावरकरांचा जीवनपट वेबसीरिजमधून उलगडणार; ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’च्या चित्रीकरणास प्रारंभ

दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील.''

451
Veer Savarkar : वीर सावरकरांचा जीवनपट वेबसीरिजमधून उलगडणार; 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स'च्या चित्रीकरणास प्रारंभ
Veer Savarkar : वीर सावरकरांचा जीवनपट वेबसीरिजमधून उलगडणार; 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स'च्या चित्रीकरणास प्रारंभ

‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. (Veer Savarkar) यावेळी या वेबसीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर, कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : जो बायडेन यांनी सावरली इस्रायलची बाजू; म्हणाले ते तुम्ही नव्हेच !)

दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, “सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे, असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील. त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते, तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. (Veer Savarkar)

सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे

सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे, असा आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही, ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

पुढे बोलताना सोमण म्हणाले की, आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले; परंतु वेबसीरिजच्या माध्यमातून प्रथमच ही मालिका समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील ४ सीझनमध्ये ही वेबसीरिज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे.

डॉ. अनिर्बान सरकार म्हणाले, “सावरकर हे जन्मतः क्रांतिकारी होते. त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर येण्याची गरज होती; कारण सेल्युलर जेल, कोलू ओढला, त्यांनी बोटीतून मारलेली उडी एवढेच लोकांना माहित आहे. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान, त्यांनी केलेला त्याग यांच्याबद्दलचे वास्तव कुणालाच माहिती नाही. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहित व्हावे यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज समोर आणणार आहोत. लोकांनी या वेबसीरिजला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सावरकर समजून घ्यावेत अशी अपेक्षा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी, हे माझे स्वप्न होते, ते या वेबसीरिजच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.” (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.