इस्लायल-पॅलेस्टाईन युद्धाचे संपूर्ण परिणाम दिसू लागले आहेत. (Sharad Pawar On Palestine) इस्लामी देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली, तर अमेरिका, भारत या देशांनी इस्लायलची बाजू घेतली आहे. भारताने इस्लायलला अधिकृत पाठिंबा देऊनही काँग्रेसने पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली आहे. (Sharad Pawar On Palestine)
(हेही वाचा – Sharad Pawar On Palestine : ही कुजकी मानसिकता; पियुष गोयल यांची शरद पवारांवर टीका)
एका कार्यक्रमात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. ”ज्या भागात युद्ध सुरू आहे, ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झाले आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचे नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असतांना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांची भूमिका काहीही असो; परंतु आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे”, असे शरद पवार या वेळी म्हणाले. (Sharad Pawar On Palestine)
शरद पवारांच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांवर टीका केली आहे. ट्विटरवर फडणवीसांनी म्हटले आहे, इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. त्याचवेळी भारताने दहशतवादाचा विरोध केला आहे. मग तो कुठल्याही स्वरूपात आणि कुणाच्याही विरोधात असो, दहशतवादाला भारताने कायमच कडाडून विरोध केला आहे. (Sharad Pawar On Palestine)
India has never changed its position on the Israel-Palestine dispute.
However, at the same time, India has been consistently against & has always strongly opposed terrorism in any form and against anyone.
When the entire world has condemned the killing of innocent people in…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 18, 2023
फडणवीस यांनी म्हटले आहे की, इस्त्रायलमध्ये जेव्हा निष्पाप लोक मारले गेले, तेव्हा संपूर्ण जगाने त्याची कडाडून निंदा केली. तसाच निषेध भारतानेही केला. शरद पवार यांनीही तेच करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत. विशेषत: २६/११ च्या वेळी मुंबईने अनेक नागरिक गमावले. माझी शरद पवार यांना विनंती आहे की, केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करु नका, तर दहशतवादाचा तीव्र शब्दात धिक्कार करा. (Sharad Pawar On Palestine)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community