Mumba Devi Temple Car Parking : मुंबादेवी मंदिरा जवळील वाहनतळाची जागा बदलणार

मुंबादेवी मंदिराजवळील जागेत स्वयंचलित यांत्रिक वाहनतळाची निर्मिती करण्याचा निर्णय घेत यासाठी कंत्राटदाराची निवड केली असली तरी प्रत्यक्षात यासाठी निश्चित केलेली जागा मंदिर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बदलण्यात येणार आहे.

869
Mumba Devi Temple Car Parking : मुंबादेवी मंदिरा जवळील वाहनतळाची जागा बदलणार
Mumba Devi Temple Car Parking : मुंबादेवी मंदिरा जवळील वाहनतळाची जागा बदलणार

मुंबादेवी मंदिराजवळील जागेत स्वयंचलित यांत्रिक वाहनतळाची निर्मिती करण्याचा निर्णय घेत यासाठी कंत्राटदाराची निवड केली असली तरी प्रत्यक्षात यासाठी निश्चित केलेली जागा मंदिर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बदलण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने ही विनंती केल्याने या साठी नवीन जागेचा शोध सुरु असून त्यानुसार नवीन जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वाहनतळ उभारले जाईल, अशी माहिती शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. (Mumba Devi Temple Car Parking )

मुंबई महापालिका मुख्यालय पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेवक अमेय घोले, माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आदी उपस्थित होते. मुंबादेवी येथील वाहन तळाच्या कामाला तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला असून मंदिराच्या अगदी जवळ हे वाहनतळ असल्याने, मंदिराची सुरक्षा लक्षात घेता व्यवस्थापनाने व्यक्त केलेली चिंता याचा विचार करता वाहनतळाची जागा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नवीन जागा निश्चित करून त्याच नियुक्त कंत्राटदाराकडून हे काम करून घेतले जाईल. ज्यामुळे याला अधिक विलंब होणार नाही असे त्यांनी सांगितले. (Mumba Devi Temple Car Parking )

New Project 2023 10 18T220104.338

शटर आणि रोबो पार्क पध्दतीनुसार मुंबादेवी जवळील जागेमध्ये ५४६ क्षमता असेल. याठिकाणी १८ मजल्याच्या वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे. मुंबादेवी येथील मोकळ्या जागेतील वाहनतळासाठी एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. तत्पूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईतील नागरिकांशी महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी संवाद साधत १७ विविध प्रकारच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी आढावा घेतला. ही कामे योग्यप्रकारे आणि वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित या बैठकीस खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विविध विभागांचे व परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Mumba Devi Temple Car Parking)

(हेही वाचा – Sharad Pawar On Palestine : केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करू नका; आता देवेंद्र फडणवीसांचीही शरद पवारांवर टीका )

या बैठकीत पालकमंत्री केसरकर यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किचन गार्डन सुरू करणे, मध्यान्ह भोजनात भाजीपाल्याचा योग्यप्रकारे वापर करणे, शाळांच्या इमारतींचे सुशोभीकरण करणे; शाळेतील ग्रंथालयांमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर आदी प्रेरणादायी व्यक्तींची आत्मचरित्रं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे; प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची निर्मिती; बेस्टच्या जुन्या बसेस निकाली काढण्याऐवजी त्यात रचनात्मक सुधारणा करून त्यांचा उपयोग काही ठिकाणी आर्ट गॅलरी, वाचनालये, रेस्टॉरंट यासाठी करणे करणे; महालक्ष्मी मंदिर परिसर विकास; बेगर होमबद्दलचे धोरण व व्यवस्था करणे; रात्र निवासबाबत नियोजन करणे; वाहनतळ आरक्षण, वाहतुकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे; विद्यमान उद्याने व क्रीडांगण आरक्षणाचा विकास करणे, झोपडपट्टी वसाहतीत शौचालयांची पुनर्बांधणी करणे, महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारणे, ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ची निर्मिती करणे आदी कामांचा आढावा घेतला. मुंबईतील नागरिकांचे जनजीवन सुरळीत आणि सुलभ करण्यासाठी ही कामे महत्वाची असून ती योग्यप्रकारे आणि वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश यावेळी केसरकर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. (Mumba Devi Temple Car Parking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.