IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या पुण्यातील हवामानाबद्दल

169
IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचं सावट? जाणून घ्या पुण्यातील हवामानाबद्दल

यावर्षीच्या म्हणजेच २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात (IND vs BAN) भारताचा सामना आणखी एका आशियाई प्रतिस्पर्धीसोबत होणार आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात रोहित शर्माची ब्लू आर्मी शकिब अल हसनच्या बांगलादेशविरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धेत भारत आपल्या सलग चौथ्या विजयासाठी तयार आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला हरवून विजयाची हॅट्रिक केली आहे, तर बांगला टायगर्सने (IND vs BAN) केवळ अफगाणिस्तानवर विजय मिळवला असून न्यूझीलंड आणि इंग्लंडकडून त्यांचा पराभव झाला आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 AFG vs ENG : अफगाणिस्तानच्या दणदणीत विजयाचा पॉईंट्स टेबलवर परिणाम)

अशातच भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यापासून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार १८ ऑक्टोबर रोजी थोडा पाऊस पडला होता. तसेच, भारतीय हवामान विभागाने या आठवड्याच्या सुरुवातीला पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. दरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या दिवशी तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एक्यूवेदरच्या म्हणण्यानुसार, पुण्यात गुरुवारी (IND vs BAN) पाऊस पडण्याची केवळ १% शक्यता आहे. तर दिवसा तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि रात्री २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दिवसभरात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

भारताची संभाव्य टीम :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज (IND vs BAN)

बांगलादेशची संभाव्य टीम :

लिट्टन दास, तंजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो, शकिब अल हसन * (कर्णधार) मुशिफिकुर रहीम (यष्टीरक्षक) तौहिद हृदॉय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, मुस्तफिझुर रहमान, शोरीफुल इस्लाम (IND vs BAN)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.