Lalit Patil : ड्रगमाफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या ‘त्या’ दोघी पोलिसांच्या ताब्यात

132
Lalit Patil : ड्रगमाफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या 'त्या' दोघी पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथे अटक केली. तो २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

ललिल पाटील (Lalit Patil) रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासन याबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप होत होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही यामध्ये समावेश झाला. यादरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या दोघांबाबत कारवाई सुरू असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी तामिळनाडूतील चेन्नई येथून अटक करण्यात आली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. अशातच आता ललितच्या दोन मैत्रिणींना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ललितला पळून जाण्यास या दोन मैत्रिणींनी मदत केली होती.

(हेही वाचा – Mumbai – Pune Air Pollution : काळजी घ्या! मुंबई – पुण्यातल्या हवेची गुणवत्ता खालावली)

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या (Lalit Patil) अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावं आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Lalit Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.